JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / स्मार्टफोनने करा TV कंट्रोल; Google लवकरच आणणार नवीन फिचर

स्मार्टफोनने करा TV कंट्रोल; Google लवकरच आणणार नवीन फिचर

गुगलचं हे ऍप यशस्वी झालं तर, एन्ड्रॉईड टिव्हीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. त्यामुळे मुलांच्या जास्त टिव्ही बघण्याच्या सवयीचं टेन्शन संपणार आहे.

जाहिरात

मुलांना बालपणातच शिस्तीचे धडे द्यायला हवेत. सकाळी लवकर उठणे, लवकर झोपणे, वेळेत अभ्यास करणे, स्वतःची कामं स्वतः करणे अशा सवयी मुलांना बालपणात लागल्या तर त्यांचा आयुष्यामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 11 जुलै : मुलांच्या जास्त टिव्ही (TV) बघण्याच्या सवयीने कंटाळेलेल्या पालकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. मोबाईल कंट्रोल (Mobile  Control App) करणाऱ्या ऍपनंतर आता लवकरचं टीव्ही कंट्रोल करणारं ऍप (TV Control App) येणार आहे. सध्या गुगल ‘गुगल टीव्ही’ (Google TV) नावाच्या एका ऍपवर काम करत आहे. हे ऍप**(App)** यशस्वी झालं तर, एन्ड्रॉईड टिव्हीवर (Android TV) नियंत्रण ठेवता येणार आहे. गुगलने लवकरच लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे टिव्हीचे चॅनल बदलण्यासाठी रिमोटची गरज संपणार आहे. टेस्टींग सुरू आहे गुगलचं हे फिचर अद्याप पूर्णपणे तयार झालेलं नाही. कारण गुगलकडून या संदर्भात अधिकृत घोषणा कारण्यात आलेली नाही. Google Android टिव्ही रिमोट ऑप्शन 4.27 व्हर्जन आणणार आहे. याचं टेस्टींग सुरू असल्याचं बोललं जात आहे. गुगलचं Android TV Remote control App सध्या Play Store मध्ये उपलब्ध आहे. ( 1 लाखाचे 8 लाख! ही गुंतवणूक करणारे झाले मालामाल, तुम्ही हा शेअर खरेदी केलाय का? ) जे अद्याप अपडेट करण्यात आलेलं नाही. गुगलचं नवीन फिचर तयार झाल्यावर हे ऍप अपडेट होण्याची शक्यता आहे. तर, गुगल नवीन टिव्ही ऍपही आणू शकतं अशीही शक्यता आहे. ( जुनी नाणी आणि नोटा आहेत का? मग तुम्ही एका रात्रीत होऊ शकता श्रीमंत; कसं ते वाचा ) XDA डेव्हलपरच्या रिपोर्टनुसार टीव्ही कंट्रोल करण्यासाठी हे ऍप आधी आपल्या टीव्हीबरोबर पेअर करावं लागेल. त्यानंतर ते आपल्याला टीव्हीच्या कंट्रोल लिस्टमध्ये दिसेल. त्यानंतर पेअरिंग करताना त्यामध्ये 4 अंकी कोड टाकावा लागेल. हा 4 अंकी कोड आपल्या टीव्ही स्क्रीनवर दिसेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर,आपला स्मार्टफोन टीव्ही रिमोट म्हणून काम करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या