JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Tiktokला टक्कर देण्यासाठी Google आणणार नवीन अ‍ॅप, असे असतील फिचर्स

Tiktokला टक्कर देण्यासाठी Google आणणार नवीन अ‍ॅप, असे असतील फिचर्स

टीक-टॉक युझरसाठी मोठी बातमी, गूगलही आणणार नवीन अ‍ॅप.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : दिग्गज कंपनी गूगलनं अमेरिकेच्या सोशल व्हिडीओ अ‍ॅपफायरवर्कला (social video app firework) विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलनं ही योजना खर तर टीक-टॉक या प्रसिध्द अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी निर्णय घेतला आहे. टीक-टॉकप्रमाणे या अ‍ॅपमध्येही छोटे व्हिडीओ तयार आणि शेअर करता येणार आहेत. वॉल स्ट्रटी जर्नलनं दिलेल्या माहितीत, चायनीज मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वीबोनेही (Weibo) फायरवर्क विकत घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. मात्र गुगलसोबत फायरवर्क काम करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅलिफोर्निया येथील फायरवर्क या कंपनीनं गेल्या वर्षी भारतात शिरकाव केला होता. यावर्षी या कंपनीनं 10 कोटी डॉलरपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर, टीक-टॉकची किंमत सध्या 75 अरब डॉलर आहे. टीक-टॉकवर युझर 15 सेकंदाचे व्हिडीओ तयार करू शकतात. तर फायरवर्क या अ‍ॅपमध्ये युझर 30 सेकंदाचे व्हिडीओ तयार करून शेअर करू शकतात. यात युझर आपल्या मोबाईलवरून एकाच शॉटमध्ये वेगवेगळच्या दिशांनी व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतात. वाचा- इन्स्टाग्रामचा फेसबुक अवतार! लॉंच झाले नवीन अ‍ॅप, जाणून घ्या याचे फिचर

हे अ‍ॅप iOS आणि Androidमध्येही उपलब्ध असणार आहे. फायरवर्क या अ‍ॅपचे लाखो युझर आहे. दरम्यान गुगलनं ही कंपनी विकत घेतल्यास टीक-टॉकला चांगलीच टक्कर देऊ शकतात. वाचा- WhatsApp युझरसाठी महत्त्वाची बातमी, एका GIF फाइलमुळे होऊ शकतो फोन हॅक! VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या