JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Chandrayaan-3 : 130 हत्तींइतकं वजन; कुतुबमिनारापेक्षाही अधिक उंच, जाणून घ्या चांद्रयान वाहून नेणाऱ्या खास रॉकेटबद्दल

Chandrayaan-3 : 130 हत्तींइतकं वजन; कुतुबमिनारापेक्षाही अधिक उंच, जाणून घ्या चांद्रयान वाहून नेणाऱ्या खास रॉकेटबद्दल

अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेलं भारताचं चांद्रयान अखेर अवकाशात झेपावलं आहे.

जाहिरात

चांद्रयान आवकाशात झेपावलं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 14 जुलै : अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेलं भारताचं चांद्रयान अखेर अवकाशात झेपावलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)नं आज दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान 3 चं प्रक्षेपण केलं. चांद्रयान तीन हे एका रॉकेटद्वारे वाहून नेलं जाणार आहे, त्यानंतर ते चंद्राच्या कक्षेत प्रस्थापीत केलं जाईल. याच रॉकेटचा उपयोग हा साडेतीन वर्षांपूर्वी चांद्रयान 2 मोहिमेसाठीही करण्यात आला होता. हे रॉकेट भारतीय अंतराळ संस्थेनं तयार केलेलं खास असं रॉकेट आहे.  रॉकेटची खास वैशिष्ट्ये या रॉकेटचं एकूण वजन 642 टन एवढे आहे. याचाच अर्थ या रॉकेटचं वजन 130 हत्तींच्या वजनाएवढे आहे. तसेच या रॉकेटची उंची ही 43. 5 मीटर म्हणजे एका 15 मजली इमारतीपेक्षाही जास्त आहे. या रॉकेटची उंची कुतुबमिनारापेक्षाही जास्त आहे. या रॉकेटचं नाव जिओसिंक्रोनस स्टँडिंग सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मार्क 3 म्हणजेच GSLV Mk3 आहे. मात्र इस्रोचे सैनिक या यानाला बाहुबली नावानेच संबोधतात. या रॉकेटमध्ये भरण्यात आलेलं इधंन देखील विशेष प्रकारचं आहे. 615 कोटींचा खर्च गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास 615 कोटी रुपयांचा खर्च करुन चांद्रयान - 3 विकसित करण्यात आलं. आज अखेर हे अंतराळयान अवकाशात झेपावलं आहे. चांद्रयान 3 ऑगस्टला लँड करेल आणि त्याचा लँडर आणि रोव्हर चंद्राच्या एक दिवसा इतके काम करणार आहे. चंद्राचा एक दिवस म्हणजे पृथ्वीचे 14 दिवस. लँडर आणि रोव्हर केवळ चंद्रावरील एका दिवसासाठी काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, कारण ते रात्रीच्या अति थंडीचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना पहाटेच उतरावं लागतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या