नवी दिल्ली, 14 जानेवारी : ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) ग्राहकांसाठी सतत ऑफर्स, सेल जारी करत असते. सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, गॅजेट्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि इतर गोष्टी ऑफर प्राईजमध्ये खरेदी करता येतात. पण आता कंपनी एका सेलमध्ये मोफत स्मार्टफोन खरेदीची संधी देत आहे. ही ऑफर 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या ऑफरअंतर्गत फ्लिपकार्टवरुन फ्रीमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतो. मिळेल 100 टक्के कॅशबॅक - 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट स्मार्टपॅक प्रोग्रामअंतर्गत मोफत फोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे. यात ग्राहक आपल्या आवडीचा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. फ्लिपकार्ट स्मार्टपॅक प्रोग्राम एक सब्सक्रिप्शन बेस्ड सर्व्हिस आहे. यासाठी युजरला स्मार्टफोन खरेदी करताना 12 महिने किंवा 18 महिन्यांचं सब्सक्रिप्शन खरेदी करावं लागेल. सब्सक्रिप्शनचा कालावधी संपल्यानंतर युजरला त्या स्मार्टफोनचा 100 टक्के कॅशबॅक मिळेल.
स्मार्टपॅक मासिक शुल्क 399 रुपयांपासून सुरू - फ्लिपकार्ट युजर्सला गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ स्मार्टपॅक ऑफर करेल. याचा कालावधी 12 महिने ते 18 महिनांपर्यंत असेल. या स्मार्टपॅकचं मासिक शुल्क 399 रुपयांपासून सुरू आहे. युजर नवा स्मार्टफोन खरेदी करताना, यापैकी एका स्मार्टपॅकची आपल्या आवडीनुसार निवड करू शकतात. स्मार्टपॅक खरेदी केल्यानंतर ग्राहकांना SonyLIV, Zee5 Preimum, Voot Select, Zomato Pro अशा स्र्व्हिसेसही मिळतील. गोल्ड प्लॅनमध्ये 100 टक्के कॅशबॅक मिळेल. सिल्व्हर पॅकमध्ये 80 टक्के मनीबॅक मिळेल. तर ब्रॉन्झ पॅकमध्ये ग्राहकांना आपल्या स्मार्टफोनच्या खरेदीवर 60 टक्के पेसे परत मिळतील.
ही आहे अट - स्मार्टपॅकचा सब्सक्रिप्शन टाईम संपल्यानंतर, ग्राहकांना स्मार्टफोनचे 100 टक्के पैसे परत मिळतील. त्यासाठी आपला फोन चालू स्थितीत ठेवावा लागेल. फोन चालू स्थितीत असण्यासह, फोनवर आयएमईआय नंबर दिसायला हवा. सब्सक्रिप्शन ऑफरमध्ये Realme, Poco, Samsung, Redmi, Motorola, Infinix, Oppo, Vivo आणि इतर लोकप्रिय ब्रँडचे फोन खरेदी करता येऊ शकतात.