JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Flipkart ची नवी सर्विस, घरबसल्या स्वस्तात ऑर्डर करता येणार औषधं; पाहा कशी आहे सुविधा

Flipkart ची नवी सर्विस, घरबसल्या स्वस्तात ऑर्डर करता येणार औषधं; पाहा कशी आहे सुविधा

आता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने एक नवी सर्विस सुरू केली आहे. ज्यात तुम्ही घरबसल्या हवी ती औषधं ऑनलाइन मागवू शकता. फ्लिपकार्टने Flipkart Health+ नावाने ही नवी सुविधा सुरू केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 एप्रिल : गेल्या काही वर्षात आणि कोरोना काळापासून ऑनलाइन शॉपिंगमध्ये (Online Shopping) मोठी वाढ झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये आपल्या गरजेचं, आवडीचं सामान घर बसल्या मागवता येतं. त्यासाठी कुठेही न जाता, हवं तितकं सर्च करुन बजेटनुसार खरेदी करता येते. ऑनलाइन शॉपिंग अनेकांसाठी फायद्याचं, वेळ वाचवणारं ठरतं. आता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने (Flipkart) एक नवी सर्विस सुरू केली आहे. ज्यात तुम्ही घरबसल्या हवी ती औषधं ऑनलाइन (Medicine Online Order) मागवू शकता. फ्लिपकार्टने Flipkart Health+ नावाने ही नवी सुविधा सुरू केली आहे. 6 एप्रिल रोजी Flipkart ने एका नव्या सर्विसची घोषणा केली आहे. एक डिजीटल हेल्थकेयर मार्केटप्लेस Flipkart Health+ असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे लोक सहजपणे आपल्या गरजेची औषधं स्वस्तात खरेदी करू शकतात. जी औषधं डिलीव्हर केली जातील त्याची क्वॉलिटीही चांगली असेल असा दावा फ्लिपकार्टने केला आहे.

हे वाचा -  मोदी सरकारची मोठी कारवाई, पहिल्यांदाच 18 भारतीय YouTube Channels Ban; सांगितलं कारण

Flipkart Health+ App - Flipkart चं हे App देशातील जवळपास 20 हजार पीन कोडशी जोडलेल्या पत्त्यांवर औषधं डिलीव्हर करेल. यात दूरची गावं आणि इतर भागही सामिल असतील. Sastasundar.com नावाच्या हेल्थकेअर नेटवर्कसह हातमिळवणी करुन Flipkart Health+ App ने 500 हून अधिक रजिस्टर्ड औषधांची विक्री करणाऱ्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर सामिल केलं आहे.

हे वाचा -  SBI Alert! तुम्हालाही असा SMS आला तर चुकूनही क्लिक करू नका, बँक अकाउंट धोक्यात

या App च्या विश्वसनीयतेबाबतही फ्लिपकार्टने माहिती दिली आहे. या App वर ज्या औषधांची विक्री केली जाईल, ज्या औषध विक्रेत्यांना App ने सामिल केलं आहे, ते डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवरच काम करतात आणि योग्य औषधं देतात. कंपनीने या औषध विक्रेत्यांची योग्यरित्या चाचणी केली असून त्यानंतरच त्यांना या प्लॅटफॉर्मवर औषधं विक्रीसाठी सामिल केलं आहे. Flipkart Health+ App हे वेगळं App असून ते फोनवर डाउनलोड करावं लागेल. सध्या हे App Google Play Store वरच उपलब्ध आहे. लवकरच ते iOS युजर्ससाठीही उपलब्ध होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या