Home /News /technology /

SBI Alert! तुम्हालाही असा SMS आला तर चुकूनही क्लिक करू नका, बँक अकाउंट धोक्यात

SBI Alert! तुम्हालाही असा SMS आला तर चुकूनही क्लिक करू नका, बँक अकाउंट धोक्यात

अनेक SBI युजर्सला आपला पॅन नंबर लिंक करण्याबाबत मेसेज येत होता. हा मेसेज स्टेट बँकेने पाठवला असल्याचं भासवलं जातं. पण हा एक फिशिंग फेक स्कॅम असतो.

  नवी दिल्ली, 5 एप्रिल : देशात कोरोना काळात ऑनलाइन व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली. एकीकडे ऑनलाइन गोष्टींमध्ये वाढ झाली असताना दुसरीकडे सायबर क्राइमच्या (Cyber Crime) संख्येतही वाढ झाली आहे. फिशिंग स्कॅम (Phishing Scam) इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या स्कॅममध्ये युजरने आपल्या डिटेल्स शेअर केल्यानंतर अकाउंटमधून पैसे चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता अशीच घटना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसोबत होत आहे. अनेक SBI युजर्सला आपला पॅन नंबर लिंक करण्याबाबत मेसेज येत होता. हा मेसेज स्टेट बँकेने पाठवला असल्याचं भासवलं जातं. पण हा एक फिशिंग फेक स्कॅम असतो. जर तुमचंही State Bank Of India मध्ये अकाउंट असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. SBI च्या नावाने आलेला मेसेज अगदी खऱ्या मेसेजप्रमाणेच दिसतो. ग्राहकांनाही हा मेसेज बँकेनेच पाठवला असल्याचं वाटतं. त्यामुळे ग्राहक या फेक लिंकवर लिंक करतात आणि आपले डिटेल्स शेअर करतात. परंतु ही फेक लिंक असल्याने ग्राहकाचे संपूर्ण डिटेल्स फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि अकाउंट खाली होतं. SBI ग्राहकांना मेसेजमध्ये असा मेसेज आला, की 'तुमचा पॅन नंबर अपडेट नसेल तर तो खालील लिंकवर क्लिक करुन अपडेट करा. इथे अपडेट न केल्यास तुमचं YONO अकाउंट ब्लॉक केलं जाईल.'

  हे वाचा - PAN-Aadhaar Card Link केलं नाही? आता इतका दंड भरुन अशी करा प्रक्रिया

  YONO हा SBI चा डिजीटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. मेसेजमध्ये आलेली लिंक SBI च्या नावाने येते. त्यात युजरची माहिती भरण्यास सांगितलं जातं. युजरने आपले डिटेल्स टाकल्यास ही माहिती थेट हॅकरपर्यंत पोहोचते आणि त्याचा दुरोपयोग केला जातो. हा एक प्रकारचा स्टँडर्ड फिशिंग अटॅक आहे. त्यामुळे मेसेजमध्ये आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तसंच कोणत्याही ईमेल, कॉल, एसएमएस, एम्बेड लिंकमध्ये उत्तर देऊ नका. कारण बँक कधीही कोणत्याही ग्राहकाचे डिटेल्स अशाप्रकारे लिंक किंवा कॉलमध्ये मागत नाही. त्यामुळे बँकेच्या नावाने मेल, एसएमएस, कॉल आल्यास कधीही उत्तर देऊ नका. अशाप्रकारे कोणताही मेसेज आल्यास report.phishing@sbi.co.in वर किंवा हेल्पलाइन नंबर 1930 वर संपर्क करू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Cyber crime, Online fraud, SBI, Sbi account, Sbi alert, Tech news

  पुढील बातम्या