JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / पाहा एका ट्विटमुळे कसं फळफळलं हॅकरचं नशीब? एलन मस्क यांनी तरुणाला थेट दिली नोकरी

पाहा एका ट्विटमुळे कसं फळफळलं हॅकरचं नशीब? एलन मस्क यांनी तरुणाला थेट दिली नोकरी

फक्त एका ट्विटमुळे एका तरुणाला नोकरी देण्याचं काम मस्क यांनी केलं आहे. त्यांनी अ‍ॅपलच्या एका हॅकरची ट्विटरवरून नियुक्ती केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली - सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यापासून उद्योगपती एलन मस्क दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता फक्त एका ट्विटमुळे एका तरुणाला नोकरी देण्याचं काम मस्क यांनी केलं आहे. त्यांनी अ‍ॅपलच्या एका हॅकरची ट्विटरवरून नियुक्ती केली आहे. या तरुणाने मस्क यांना ट्विट करून त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानंतर मस्क यांनी त्याला रिप्लाय दिला आणि कंपनीत नोकरीही दिली. टेक वेबसाइट ‘द व्हर्ज’ने दिलेल्या वृत्तानुसार, मस्क यांनी जॉर्ज हॉज या माजी आयफोन हॅकरला नोकरीवर घेतलं आहे. ट्विटरच्या सर्च संदर्भात येणाऱ्या समस्या सोडवणं हे त्यांचं काम असेल. हॉजने एका ट्विटद्वारे आपलं जॉयनिंग कन्फर्म केलं आहे. त्यानंतर ट्विटरवरून नोकरी मिळाल्याबद्दल काही युजर्सनी आश्चर्य व्यक्त केलंय. “एलन मस्क यांनी मला माझं काम सांगितलं आहे आणि मी ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करेन. माझ्याकडे 12 आठवड्यांचा वेळ आहे,” असं हॉजने ट्विटमध्ये म्हटलंय. एका ट्विटपासून झाली सुरुवात हॉजने काही दिवसांपूर्वीच एक ट्विट करून एलन मस्क हे पाषाणहृदयी असल्याचं म्हटलं होतं. तसंच “त्यांच्या अशा अ‍ॅटिट्युडमुळेच सर्वोत्कृष्ट गोष्टी आकाराला येतात. ज्यांना काही विशाल करण्याची महत्त्वाकांक्षा नाही, त्यांनी अशांपासून (व्यक्तींपासून) दूर रहावं,” असं हॉजने ट्वीटमध्ये म्हटलं होतं. यानंतर त्याने मस्कना आपण सेवा देण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. त्याने आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं, “मी जिथे असेन तिथंच माझे पैसे असावेत असं मला वाटतं. मला ट्विटरमध्ये 12 आठवडे इंटर्नशिप करायला आवडेल. ती सुद्धा फक्त राहण्या-खाण्याच्या मोबदल्यात. हे काम पैसे कमावण्यासाठी नाही, तर हे जग राहण्यासाठी अधिक चांगलं व्हावं यासाठी.” मस्क यांनी ट्विटला केला रिप्लाय हॉजच्या या ट्विटला एलन मस्क यांनी रिप्लाय दिला. “नक्कीच, चला आपण याबद्दल बोलूयात,” असं मस्क यांनी ट्विट केलं. यानंतर लवकरच हॉजने ट्विटरमध्ये इंटर्नशिप करण्यास सुरुवात केली. ट्विटरमध्ये होत असलेल्या तांत्रिक बदलांसाठी मदत करण्यास मस्क यांनी हॉजला कामावर ठेवलंय. हॉजने आयफोन हॅक केल्यानंतर तो चर्चेत आला होता. हॉज हे काम करणार हॉजने आणखी एका ट्विटमध्ये आपल्या कामाबद्दल सांगितलं. “मी इंटर्न म्हणून ट्विटरसोबत काम करत आहे आणि या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्चची यंत्रणा सुधारण्यासाठी काम करेन. त्यांनी युजर्सकडून फीडबॅकही मागवला आहे. मी फुकट काम करत नाही, तर आवडतं म्हणून करतोय. इथं काम शिकण्याची आणि सुधारण्याची चांगली संधी आहे,” असं त्याने सांगितलं. दरम्यान, हॉजने या पूर्वी सेल्फ ड्रायव्हिंग कारचा डेव्हलपर म्हणूनही काम केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या