JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / कमालीचा योगायोग! दिवाळीच्या रात्री होणार ‘दैवी’ आतषबाजी

कमालीचा योगायोग! दिवाळीच्या रात्री होणार ‘दैवी’ आतषबाजी

भारतासह संपूर्ण (Effect of solar magnetic storm likely to be seen on the diwali night) देशभरात दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाची आतषबाजी साजरी होत असतानाच एक दैवी आतषबाजीदेखील होणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 4 नोव्हेंबर: भारतासह संपूर्ण (Effect of solar magnetic storm likely to be seen on the diwali night) देशभरात दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाची आतषबाजी साजरी होत असतानाच एक दैवी आतषबाजीदेखील होणार आहे. सूर्यावरून पृथ्वीच्या दिशेला झेपावलेल्या (Light of solar storm) वादळाचा परिणाम पृथ्वीवर दिसणार असून दक्षिण आणि उत्तर ध्रुवाच्या भागात प्रकाशमान वातवरण झाल्याचा अनुभव घेता येणार आहे. काय आहे प्रकार? काही आठवड्यांपूर्वीच सूर्याचं एक चुंबकीय वादळ (Magnetic Storm) तयार झालं आहे. या वादळाचा परिणाम 4 नोव्हेंबर रोजी पृथ्वीवर दिसेल, असा वैज्ञानिकांचा होरा आहे. या काळात उत्तर आणि दक्षिण ध्रुवाचा भाग प्रकाशमय होईल आणि नेहमीपेक्षा कित्येक पट अधिक प्रकाश या भागात पडल्याचं पाहता येईल, असं सांगण्यात आलं आहे. शास्त्रज्ञ सज्ज कोलकात्याच्या स्थिती सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पेस सायन्स या संस्थेच्या वतीनं सर्वप्रथम या घटनेची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर अमेरिकेतील काही संस्थांनीदेखील अशाच प्रकारचा अंदाज वर्तवला. त्यामुळे कोलकात्याच्या संस्थेनं वर्तवलेल्या अंदाजाला पुष्टी मिळाली आहे. या संस्थेतील शास्त्रज्ञांसह जगभरातील अनेकजण या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. सामान्यांवर काय परिणाम? या वादळाचा सामान्यांवर थेट असा कुठलाही परिणाम होणार नाही. या घटनेत केवळ प्रकाश पडणार असून कुठलाही स्फोट होण्याची शक्यता नसल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या परिसरातून निघणारे किरण हे मानवी शरीरासाठी घातक असतात, हे खरं आहे. मात्र हे किरण पृथ्वीवर मानवापर्यंत पोहोचतच नसल्यामुळे त्यांच्यापासून कुठलाही धोका नसल्याचं सांगण्यात आलं आहे. पृथ्वीवर पोहोचण्यापूर्वीच वातावरणात हे किरण शोषून घेतले जातात. हे वाचा- टेकडीवर उभं राहून पत्नीचं सुरू होतं फोटोशूट; अवघ्या 5 सेकंदात काळाने घातला घाला दिवाळी सोलर स्टॉर्म ज्या दिवसात किंवा ज्या काळात एखादं वादळ येतं, त्याचं नाव त्या वादळाला दिलं जातं. 2000 साली आलेल्या वादळाला बास्टिले डे सॉर्म असं नाव देण्यात आलं होतं. 2003 साली आलेल्या वादळाला हॅलोविन डे स्टॉर्म असं नाव मिळालं होतं. यंदा दिवाळीच्या दिवशीच हे वादळ धडकण्याची शक्यता असल्यामुळे त्याला दिवाळी सोलर स्टॉर्म असं नाव मिळण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या