e-Aadhar: फसवणूक टाळण्यासाठी वापरा ई-आधार; ही प्रोसेस वापरून करा डाउनलोड
मुंबई, 21 जुलै: भारतामधील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक म्हणजे आधार कार्ड (Aadhar Card) होय. कोणत्याही दस्तऐवजाशी संबंधित कामासाठी याचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत आधार कार्ड सुरक्षित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. फसवणूक टाळण्यासाठी वापरकर्त्यांना मास्क आधार, ई-आधार (E-Aadhar) वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आधार जारी करणारी संस्था UIDAI ऑनलाइन मोडद्वारे ई-आधार वापरण्याची सुविधा प्रदान करते. पण तुमचं ई-आधार किती काळ वैध असतं आणि ते कधी वापरता येईल हे तुम्हाला माहिती आहे का? चला याविषयी आज जाणून घेऊया. ई-आधार म्हणजे काय?(What is e-Aadhaar?)- मास्क आधारसह ई-आधारचा वापर सुरक्षित मानला जातो. ई-आधार ही पासवर्ड-संरक्षित आधारची ऑनलाइन प्रत आहे. यावर UIDAI प्राधिकरणानं डिजिटल स्वाक्षरी केलेली असते. हे UIDAI च्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल अॅप्सवरून डाउनलोड केलं जाऊ शकतं, ज्यामध्ये 12-अंकी क्रमांक देखील दिलेला असतो. ई-आधार पासवर्ड (e-Aadhar Password)- e-aadhar साठीचा पासवर्ड हा नावाची पहिली 4 कॅपिटल अक्षरे आणि जन्म वर्ष (YYYY) पासवर्डचं असू शकते. उदाहरणार्थ, जर एखाद्या वापरकर्त्याचे नाव SURESH SHARMA असेल आणि त्याची जन्मतारीख 1990 असेल, तर पासवर्ड SURE1990 असेल. हेही वाचा: Job Opportunity : काम अत्यंत साधं, कोट्यवधींचा वार्षिक पगार तरीही मिळत नाहीत कामगार ई-आधारची वैधता (Validity of e-Aadhar)- ई-आधारमध्ये मुद्रित आधार कार्डाप्रमाणेच वापरकर्त्यांचे नाव, पत्ता, जन्मतारीख यासह संपूर्ण माहिती असते. यामध्ये आधार जारी करण्याची तारीख तसेच ई-आधार डाउनलोड तारखेची माहिती देण्यात आली आहे. IT कायदा 2000 अंतर्गत ई-आधारवर डिजिटल स्वाक्षरी मंजूर करण्यात आली आहे. तुमच्या छापील आधार कार्डप्रमाणे ई-आधार देखील वैध असल्याचे UIDAI कडून सांगण्यात आलं आहे. जर प्रिंटेड आधार कार्ड कालबाह्य झालं तर तुमचे ई-आधार देखील वैध राहणार नाही. ते कुठंही वापरले जाऊ शकतं. ई-आधार कसं डाउनलोड करायचं?(How to download e-aadhar?)- हे दोन प्रकारे डाउनलोड केले जाऊ शकतं, तुम्ही नावनोंदणी क्रमांक वापरून आधीच ई-आधार डाउनलोड करू शकता अन्यथा तुम्ही आधार क्रमांक देखील वापरू शकता.
आधार क्रमांकावरून ई-आधार कसं डाउनलोड करायचं? पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि पिन कोडसह ई-आधार 12 अंकी आधार क्रमांक आधार वेबसाइटवर डाउनलोड केला जाऊ शकतो. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP टाकावा लागेल, त्यानंतर ई-आधार डाउनलोड करता येईल.