दिल्ली, 27 जुलै : कार असो किंवा बाईक अनेकदा वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करूनही कमी मायलेज देतात. तेव्हा गाडी रिपेअर करणाऱ्यांकडून किंवा तज्ज्ञांकडून गाडीची देखभाल करण्याबाबत बरेच सल्लेही दिले जातात. यात पेट्रोल भरण्याबद्दलही सांगण्यात येत. पेट्रोल भरण्याची वेळ असते का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? चला याबद्दल माहिती घेऊ. पेट्रोल डिझेल सकाळी किंवा रात्री टाकल्याने जास्त फायदा होतो, गाडी चांगलं मायलेज देते अशी अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. यामागे असं कारण सांगण्यात येतं की, तापमान कमी असल्याने फ्युएल डेंसिटी चांगली असते आणि तुम्हाला पेट्रोल डिझेल जास्त मिळतं. तर दिवसा तापमान जास्त असते त्यामुळे योग्य प्रमाणात पेट्रोल मिळत नाही. पण हे पूर्ण चुकीचं आहे. पेट्रोल तुम्ही कधीही भरलं तरी तुम्हाला डेंसिटी तीच मिळेल जी सरकारने ठरवली आहे. गर्लफ्रेंडसाठी ओलांडली सीमा, 4 विमाने अन् टॅक्सीने केला 16 हजार किमी प्रवास सरकारकडून पेट्रोलची डेंसिटी ७३० ते ८०० किलोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर इतकी ठरवण्यात आली आहे. तर डिझेलची डेंसिटी ८३० ते ९०० किलोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी असते. या डेंसिटीचे पेट्रोल आणि डिझेल शुद्ध मानलं जातं. यावर तापमानाचा कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही पेट्रोल, डिझेल भरताना पंपावर असणाऱ्या मशिनवरूनही डेंसिटी चेक करू शकता. पेट्रोल कधी भरतात यावरून त्याची डेंसिटी ठरत नाही. अफवा मान्य जरी केली की तापमानाचा पेट्रोल डिझेलवर परिणाम होतो तरी पेट्रोल पंपावर ते शक्य नाही. पेट्रोल पंपावर टँक असतात ते जमिनीत असतात. तिथे तापमान कमी असतं. त्यामुळे दिवस आहे की रात्र याचा काहीच परिणाम टँकमधील पेट्रोल, डिझेलवर होत नाही.