नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : सध्याच्या काळात युजर्ससाठी स्मार्टफोन्सचं Overheating होणं ही मोठी समस्या बनत चालली आहे. अनेकदा युजर्स हे स्मार्टफोनच्या बाबतीत छोट्याछोट्या गोष्टींची काळजी घेत नसल्यामुळे ही समस्या उद्भवते. त्यात स्मार्टफोनच्या बॅटरी लाइफ आणि त्यासंदर्भातील बेजाबदारपणा हे ही Overheating साठी महत्त्वाचं कारण ठरतं. जास्त वेळ स्मार्टफोनचा वापर करणं आणि (battery charging tips for android phones) गेम खेळण्यामुळंही स्मार्टफोन गरम व्हायला लागतो. त्यामुळं स्मार्टफोन फुटण्याचीदेखील शक्यता असते. काही दिवसांपूर्वी वन प्लस कंपनीच्या स्मार्टफोच्या फुटण्याच्या घटना घडल्या होत्या. चार्जरही आहे Overheating साठी कारणीभूत अनेकांना रात्री स्मार्टफोनचा वापर करत असाताना झोपताना चार्जिंगला लावण्याची सवय असते. परंतु या निष्काळजीपणामुळे स्मार्टफोन Overheat होत असतो. टेक तज्ञांच्या मते स्मार्टफोनमधील बॅटरीच्या सुरक्षेसाठी त्याचा जास्त वापर आणि अतिरिक्त चार्जिंग करणं योग्य नाही. फोन 80 टक्के चार्ज असताना चार्ज करू नये तसंच स्मार्टफोनची चार्जिंग 20 टक्क्यांच्या खाली येऊ देऊ नये. त्याचबरोबर स्मार्टफोन स्विच ऑफ होईपर्यंत किंवा बॅटरी डेड होईपर्यंत स्मार्टफोनचा वापर करणं टाळायला हवं.
स्मार्टफोनला कंपनीनं दिलेल्या (Charging smartphone with a different charger) चार्जरनेच चार्ज करायला हवं. दुसऱ्या चार्जरने चार्ज करू नये. त्यामुळे बॅटरीला धोका असतो. अनेक युजर्स हे स्मार्टफोनला Heavy कव्हर घालत असतात. त्यामुळे ओवरहिटिंगची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आणि त्या कव्हरमुळे ते गरम व्हायला लागतात. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
अशी घ्या काळजी… स्मार्टफोनचा फ्लॅश लाइट अधिक वेळ चालू ठेऊ नका. त्याचबरोबर जास्त वेळ व्हिडिओ रिकॉर्डिंगमुळेही स्मार्टफोन गरम होत असतो. त्याचबरोबर स्मार्टफोनला उन्हापासूनही दूर ठेवायला हवं. स्मार्टफोनमध्ये अनेकदा Background Apps सुरू असतात. त्याद्वारे हळूहळू स्मार्टफोनची चार्जिंग संपत असते. त्यामुळेही स्मार्टफोन ओव्हरहिट होत असतो. अशावेळी या Apps बंद करून ठेवायला हव्या.