JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 8 जीबी रॅम 48 मेगापिक्सल कॅमेरा, Oppo चा नवा स्मार्टफोन बाजारात

8 जीबी रॅम 48 मेगापिक्सल कॅमेरा, Oppo चा नवा स्मार्टफोन बाजारात

ओप्पो (Oppo) या मोबाईल निर्मात्या कंपनीने आपला F19 (Oppo F19) हा नवा स्मार्टफोन (Smart phone) लॉन्च केला आहे. हा नवीन फोन मागील महिन्यात लॉन्च झालेल्या या मालिकेत आधीपासून असलेल्या ओप्पो F19 प्रो + आणि ओप्पो F19 चा भाग बनला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 एप्रिल: ओप्पो (Oppo) या मोबाईल निर्मात्या कंपनीने आपला F19 (Oppo F19) हा नवा स्मार्टफोन (Smart phone) लॉन्च केला आहे. हा नवीन फोन मागील महिन्यात लॉन्च झालेल्या या मालिकेत आधीपासून असलेल्या ओप्पो F19 प्रो + आणि ओप्पो F19 चा भाग बनला आहे. हा नवा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी असलेला सर्वात स्लिम असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. ओप्पो F19 हा 8 जीबी + 128 जीबी या एकाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची किंमत केवळ 18,990 रुपये अशी आहे. हा फोन 9 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ग्राहकांसाठी हा फोन प्रिझम ब्लॅक आणि मिडनाइट ब्लू या रंगात उपलब्ध असेल. लॉन्च ऑफरनुसार या फोनवर इन्स्टंट डिस्काऊंट दिले जाणार आहे. या योजनेतून ग्राहकांना 1500 रुपये इन्स्टंट मिळतील. मात्र याकरिता ग्राहकांना फोन खरेदी करतेवेळी एचडीएफसी (HDFC) चे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड वापरावे लागेल. ओप्पोचे ग्राहक असलेल्यांना यावर अतिरिक्त 1500 रुपयांची सूट दिली जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये आहे 60Hz चा डिस्प्ले ओप्पो F19 मध्ये 6.43 इंचाचा फूल एचडी+AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रिनचा अस्पेक्ट रेशो 90.8 टक्के आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60 Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. ओप्पोने या फोनमध्ये 6 जीबी रॅम + 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. ओप्पोचा हा फोन अॅण्ड्राईड 11 बेस्ड कलर ओएस 11.1 वर चालतो. (हे वाचा: आणखी स्वस्त झाला Realme चा बजेट 5G स्मार्टफोन, पाहा फिचर्स ) ओप्पो F19 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक (Face Unlock) फिचर सपोर्ट पण देण्यात आला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी, 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे. पॉवरचा विचार करता या फोनमध्ये 5000 mAhची बॅटरी देण्यात आली असून, ती 33 W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या