JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / मस्तच! दिवसाला फक्त 6 रुपये खर्चून मिळवा फ्री कॉलिंग आणि हाय स्पीड डेटा

मस्तच! दिवसाला फक्त 6 रुपये खर्चून मिळवा फ्री कॉलिंग आणि हाय स्पीड डेटा

बीएसएनएलने या प्लॅनची वैधता फक्त प्रमोशनल पीरियडसाठी वाढवली आहे. ती 20 ऑगस्ट 2021 पर्यंत वैध राहील.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 मे: भारतीय सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) त्यांच्या युझर्ससाठी नवनवे प्लॅन लॉन्च करत असते. बीएसएनएलने आता त्यांच्या वर्षभराच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 90 दिवसांनी वाढवली आहे. म्हणजेच युझर्सना एका वर्षाच्या 2,399 रुपयाच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 1 वर्ष 3 महिन्यांची व्हॅलिडिटी (validity) मिळेल. या रिचार्ज प्लानमध्ये (recharge plan) युझर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह (unlimited calling) हाय स्पीड डेटा (high speed data) दिला जातो. या प्लॅनमध्ये युझरला दिवसाला केवळ 5.27 रुपये खर्च करावे लागतील. बीएसएनएलने या प्लॅनची वैधता फक्त प्रमोशनल पीरियडसाठी वाढवली आहे. ती 20 ऑगस्ट 2021 पर्यंत वैध राहील. याशिवाय बीएसएनएल 100 रुपयांच्या टॉप-अपमध्ये युझरला फुल टॉक टाइम (full talk time) देईल आणि त्याची वैधता 90 दिवसांसाठी असेल. बीएसएनएल प्लान: बीएसएनएलचा 2,399 रुपयांचा प्लान एका वर्षांसाठी असून त्यात युझरला दररोज 3 GB डेटा दिला जातो. अनलिमिटेड व्हॉइस कालिंगसह युझरला रोज 100 SMS फ्री दिले जातात. तसेच MTNL च्या मुंबई आणि दिल्ली क्षेत्रामध्ये PRBT, फ्री EROS Now आणि अनलिमिटेड सॉन्ग चेंज ऑप्शनची सर्व्हिस देखील दिली जाते. एयरटेलचा 2,498 रुपयांचा प्रीपेड प्लान  एयरटेलचा (Airtel) 2,498 रुपयांच्या प्लानची वैधता एका वर्षांची असते. यामध्ये युझरला दररोज 100 SMS, 2 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येते. WhatsApp वर चुकूनही करू नका हे काम, एक चूक आणू शकते अडचणीत एयरटेलचा 2,698 रुपयांचा प्रीपेड प्लान या प्लानमध्ये युझरला दररोज2 GB डेटा दिला जातो. याची वैधता 365 दिवसांची असते. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह दररोज 100 SMS फ्री दिले जातात. याशिवाय या प्लानमध्ये युझरला Disney+ Hotstar VIPचे 1 वर्षाचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. Vodafone Ideaचा 2,399 रुपयांचा प्रीपेड प्लान Viच्या या प्लानमध्ये युझरला 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह रोज 1.5 GB डेटा दिला जातो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS फ्री दिले जातात. तसेच युझरला विकेंड डेटा रोलओव्हर आणि Binge ऑल नाइटची सुविधाही दिली जाते. Viचा 2,595 रुपयांचा प्रीपेड प्लान Viचा हा प्लॅन 365 दिवसांसाठी असतो. यामध्ये युझरला अनलिमिटेड कॉल, दररोज 100 SMS फ्री आणि 2 GB डेटा दिला जातो. तसेच युझरला विकेंड डेटा रोलओवर, Binge ऑल नाइट, Vi मुव्हिज, प्रीमियम Zee5 सब्सक्रिप्शनआणि फ्री टीवी अ‍ॅक्सेस दिला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या