JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Apple Watch च्या फीचरद्वारे गर्लफ्रेंडवर ठेवली जात होती नजर, बॉयफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात

Apple Watch च्या फीचरद्वारे गर्लफ्रेंडवर ठेवली जात होती नजर, बॉयफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात

Apple Smart Watch मुळे अनेकांचा जीवही वाचल्याच्या अनेक घटना ऐकिवात आहेत. तर दुसरीकडे याचा चुकीचा वापर झाल्याने मोठं नुकसानही झालं आहे.

जाहिरात

घड्याळ - वास्तुशास्त्रात घड्याळाला सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्हींशी जोडलेले मानले जाते. मनगटावर दुसऱ्याचे घड्याळ घालणे अशुभ मानले जाते. असे केल्याने माणसाचा वाईट काळ सुरू होतो, असे म्हणतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 मार्च : जगभरात टेक्नोलॉजी, तंत्रज्ञानाने मोठे बदल केले आहेत. एकीकडे टेक्नोलॉजीमुळे जीवन सुकर, सोपं झालेलं असताना दुसरीकडे मात्र याचा गैरवापरही होताना दिसतो. सध्या स्मार्टवॉचची (Smart Watch) मोठी क्रेझ आहे. त्यात Apple चे Smart Watch अधिक पॉप्युलर आहेत. त्यात दिल्या गेलेल्या सुविधांमुळे अनेकांना मोठा फायदा झाला आहे. Apple Smart Watch मुळे अनेकांचा जीवही वाचल्याच्या अनेक घटना ऐकिवात आहेत. तर दुसरीकडे याचा चुकीचा वापर झाल्याने मोठं नुकसानही झालं आहे. मागील काही दिवसांत अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यात क्रिमिनल्स Apple AirTag चा वापर करुन टार्गेटवर नजर ठेवत आहेत. याबाबत एक नवं प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीला Apple Watch द्वारे आपल्या गर्लफ्रेंडवर नजर ठेवल्याबाबत अटक करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत एक व्यक्ती Apple Watch द्वारे आपल्या गर्लफ्रेंडला ट्रॅक करत होता. त्यासाठी त्याने Apple Watch तिच्या कारमध्ये लावलं होतं आणि ट्रॅकिंग App द्वारे तिला ट्रॅक केलं जात होतं. त्या तरुणीने सांगितलं, की तिच्या बॉयफ्रेंडने तिला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली होती. Life360 App द्वारे दोघं एकमेकांचं लोकेशन मॉनिटर करत होते. बॉयफ्रेंडकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर तरुणीने Life360 App डिअॅक्टिव्हेट केलं. त्यावेळी तिच्या बॉयफ्रेंडने आपल्या Apple Watch द्वारे तिला ट्रॅक करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने Apple Watch तिच्या कारमध्ये लावलं होतं. याबाबत तिने पोलिसांनाही माहिती दिली त्यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हे वाचा -  iPhone च्या एका फीचरने वाचला तरुणीचा जीव, आरोपी अटकेत; पाहा नेमकं काय झालं

Apple Watch, AirPods, iPhones सारखे Apple डिव्हाइसचं लोकेशन सहजपणे Find My App द्वारे ट्रॅक करता येतं. Apple AirTag लाँच झाल्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याचा वापर अनेकांकडून लोकांवर नजर ठेवण्यासाठी करण्यात आला आहे. आता कंपनी ही समस्या दूर करण्यासाठी काम करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या