smart phone back cover
नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी: स्मार्ट फोन घेतला की आपण पहिलं काम करतो, ते म्हणजे फोनला छानपैकी कव्हर (cover) बसवणं. खरं तर फोन कोणता घ्यावा, यापेक्षाही जास्त विचार कव्हर कोणतं घ्यावं, यासाठी केला जातो. फोनला कव्हर त्याच्या सुरक्षेसाठी (safety) तसंच फोन अजून चांगला दिसावा यासाठी लावलं जातं. आज फोनच्या कव्हरच्या हजारो व्हरायटी आहेत. मुलांसाठी वेगळे फोनचे कव्हर, मुलींसाठी वेगळे. नानाविध रंग आणि आजकाल तर आपण कव्हरवर आपला फोटोदेखील छापून घेऊ शकतो. आपण फोनच्या सुरक्षेसाठी, त्याच्या लूकसाठी जे कव्हर वापरतो ना, त्याचे काही तोटेदेखील आहेत. आजकाल स्मार्टफोन कंपन्या रोज नवनवीन डिझाईन (design) आणि स्टाइल (style) असलेले स्मार्टफोन (smartphone) लाँच करत आहेत. फोनच्या लूकवर (look) आजकाल खूप फोकस (focus) केला जातोय. चांगलं डिझाईन आणि प्रीमियम दिसणारे स्मार्टफोन महाग असतात. पण त्यावर कव्हर लावताच त्या महागड्या फोनचे डिझाईन आणि लूक लपतो. त्यामुळे ज्या लूक आणि फोनच्या डिझाईनसाठी आपण पैसे खर्च केले, तो दिसतंच नाही. बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला एखाद्या फोनचं डिझाईन आवडतं. त्यामुळे तो तुम्ही विकत घेता. पण कव्हर लावल्याने ते डिझाईन दिसत नाही. त्यामुळे जर फोन विकत घेतल्यानंतर तुम्ही कव्हर लावणारच असाल तर फोनच्या डिझाईनचा विचार करू नका, त्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात. तसं फोनचा लूक आणि डिझाईन दिसावं, यासाठी क्लिअर केस (clear case) हा एक पर्याय आहे. हे कव्हर पारदर्शक असतं, त्यामुळे त्यातून फोनचं डिझाईन (design) दिसतं. याचा हा फायदा असला तरी हे कव्हर साईडने चांगलं दिसत नाही, शिवाय अगदी काही दिवसांत त्याचा रंग पिवळसर पडू लागतो, त्यामुळे कव्हर आणि फोन दोन्हीचा लूक दिसत नाही. आणि दर महिन्याला कव्हर खराब झाल्यानंतर आपण नवं घेऊ शकत नाही. त्यामुळे या कव्हरचे फायदे कमी आणि खर्च जास्त आहे. वर्षभरात तुम्ही फोन कव्हरसाठी जेवढे पैसे घालवता, ते पैसे वाचतील. आपण स्मार्टफोन खूप वेळ सतत वापरला की तो गरम (hot) होऊ लागतो. त्यात फोनचं कव्हर जाड असेल तर मग त्याला थंड व्हायला बराच वेळ लागतो. फोन कव्हरमुळे सातत्याने गरम होत असेल तर मग त्याची स्पीड कमी होण्याची शक्यता वाढते. त्यातल्यात्यात जर फोन चार्जिंगला (charging) लावून त्याचा युज करणं सुरू असेल तर मग बॅटरीवर याचा परिणाम होण्याची शक्यता असते. कव्हरमुळे फोनमधून उष्णता बाहेर पडत नाही, त्यामुळे बॅटरी सतत गरम राहते आणि त्यामुळे नुकसान होऊ शकतं. फोनला कव्हर लावलं की आपण ते काढून पाहत नाही. पण कव्हर जरी लावलेलं असलं तरी त्यात मोठ्या प्रमाणात धूळ (dust) साचते. जर जास्त दिवस फोन कव्हर काढून साफ केला नाही, तर त्यावर धुळीचे डाग पडतात. ग्लास बॅक फोन असेल तर त्यावर ते धुळीचे बारीक कण जे साफ केल्यानंतरही जात नाहीत, ते तसेच राहतात. त्यामुळे फोनचा लूक खराब होतो. शिवाय या कणांमुळे त्यावर स्क्रॅचेस पडण्याची भीतीदेखील असते.