JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / थंडीच्या दिवसांत लाँग ड्राईव्हला जाताय? हीटर सीट कुशन कव्हरने आरामदायी प्रवास करा, जाणून घ्या किंमत

थंडीच्या दिवसांत लाँग ड्राईव्हला जाताय? हीटर सीट कुशन कव्हरने आरामदायी प्रवास करा, जाणून घ्या किंमत

अति थंडीत कारमध्ये अधिक आरामदायी वाटण्यासाठी हीटर सीट कुशन वार्मर कव्हर फायद्याचं ठरू शकतं. या कव्हर्सच्या अनेक क्वालिटी आहेत. चांगल्या प्रतिच्या कव्हरमध्ये अनेक ऍडिशनल फीचर्सही मिळतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 डिसेंबर : अनेक जण थंडीच्या दिवसात (winter season)लाँग ड्राईव्ह पसंत करतात. तसंच थंडीच्या दिवसात लांबच्या प्रवासाला जाताना आपल्या कारने जाणं अधिकतर लोक पसंत करतात. थंड वातावरणामुळे थकवाही कमी जाणवतो. पण अति थंडीत कारमध्ये अधिक आरामदायी वाटण्यासाठी हीटर सीट कुशन वार्मर कव्हर (heater seat cushion warmer cover) फायद्याचं ठरू शकतं. जो थंडीच्या दिवसात ड्रायव्हिंगचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकतो. कसं काम करतं सीट कुशन वार्मर कव्हर - सीट कुशन वार्मर कव्हरच्या आत, हीटिंग वायर लावलेले असतात. जे लेदर फायबर फॅब्रिकच्या आत असतात. या हीटिंग वायरला 12 वोल्ट डीसी प्लगशी वापरताना कनेक्ट करावं लागतं. त्यानंतर कुशन वार्मर कव्हर गरम होऊ लागतं. हे कव्हर इतर नॉर्मल सीट कव्हरप्रमाणेच, सीटवर घालता येतं.

(वाचा -  सावधान! Amazon, Apple च्या नावाने ऑनलाईन फसवणूक; कसा कराल यापासून बचाव )

गरजेनुसार मेंटेन करता येणार तापमान - सीट कुशन वार्मर कव्हरमध्ये हाय आणि लो हीटिंग असा पर्याय आहे. जो थंडीच्या हिशोबाने टेम्प्रेचर मेटेंन करू शकतो. सीट कुशन कव्हर बॅटरी ऑपरेटेड कव्हर असतं, त्यामुळे शॉक लागण्याचाही धोका नाही. कव्हर फीचर्स - या कव्हर्सच्या अनेक क्वालिटी आहेत. चांगल्या प्रतिच्या कव्हरमध्ये अनेक ऍडिशनल फीचर्स मिळतात. यात हीटिंग टायमरही दिला जातो. जो फिक्स टाईमिंगनंतर ऑटो ऑफ होतो. यामुळे हाय, लो आणि मिडियम असा टेम्प्रेचर सेट करण्यासाठी वापर होतो.

(वाचा -  सेकेंड हँड बाईक खरेदी करायची? इथे मिळतील बेस्ट ऑफर्स )

काय आहे किंमत - ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर यांची किंमत 1000 ते 1200 रुपयांपासून सुरू होते. ऑनलाईन डीलवर अनेक इतर ऑफर्सही मिळतात. हे कव्हर अधिकतर काळ्या रंगात येतात. पण यात विविध पॅटर्न्सचा पर्याय उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या