JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / विज्ञानाचा चमत्कार; प्रयोगशाळेत तयार केलेला मेंदू खेळतो व्हिडीओ गेम

विज्ञानाचा चमत्कार; प्रयोगशाळेत तयार केलेला मेंदू खेळतो व्हिडीओ गेम

हा मेंदू उंदराच्या भ्रूणाच्या 8,00,000 पेशींपासून तयार करण्यात आला आहे. पॉंग हा 1970च्या दशकातला लोकप्रिय व्हिडिओ गेम या मेंदूला खेळण्यासाठी देण्यात आला होता.

जाहिरात

प्रयोगशाळेत ब्रेन सेल्सची निर्मिती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शास्त्रज्ञ नेहमीच काही तरी नवीन शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. आता शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत ब्रेन सेल्स अर्थात मेंदूच्या पेशी तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे हा मेंदू व्हिडिओ गेमही खेळू शकतो. एवढंच नाही, तर हा मिनी ब्रेन बाहेरचं वातावरण समजून घेतो आणि त्याला चांगला प्रतिसाद देतो, असा दावा केला जात आहे. ऑस्ट्रेलियातल्या कॉर्टिकल लॅबने हा मेंदू तयार केला आहे. डॉ. ब्रेट कॅगन यांनी न्यूरॉन जर्नलमध्ये या मेंदूविषयी एक लेख लिहिला आहे. डॉ. कॅगन यांनी दिलेल्या माहितीनुसार, `हा मेंदू प्रयोगशाळेतल्या एका डिशमध्ये तयार केला गेला आहे. `बीबीसी`शी बोलताना त्यांनी सांगितलं, की हा मेंदू बाह्य स्रोतांकडून माहिती गोळा करायला शिकला आहे. तसंच तो रिअल टाइममध्ये उत्तर देण्यासदेखील सक्षम आहे. येत्या काही दिवसांत या मेंदूला इतरही अनेक मोठी कामं देऊन त्याची चाचणी केली जाणार आहे,` असं डॉ. ब्रेट कॅगन यांनी सांगितलं. व्हिडिओ गेम्स खेळण्यास सक्षम मायक्रोसेफलीचा अभ्यास करण्यासाठी 2013 मध्ये मिनी ब्रेन पहिल्यांदा तयार करण्यात आला होता. हा एक आनुवंशिक विकार आहे. या विकारात मेंदू खूप लहान असतो आणि तेव्हापासूनच मेंदूच्या विकासाबाबत संशोधनासाठी त्याचा वापर केला जातो; पण पहिल्यांदाच हा मेंदू बाहेरच्या वातावरणात आणला गेला आणि त्याला एक व्हिडिओ गेम खेळायला दिला गेला. हेही वाचा -  T20 World Cup: टी20 वर्ल्ड कपआधी पाहा टीम इंडियाची काय झाली परिस्थिती? या ज्युनियर संघाचा भारताला दणका अशी केली गेली चाचणी हा मेंदू उंदराच्या भ्रूणाच्या 8,00,000 पेशींपासून तयार करण्यात आला आहे. पॉंग हा 1970च्या दशकातला लोकप्रिय व्हिडिओ गेम या मेंदूला खेळण्यासाठी देण्यात आला होता. हा मिनी ब्रेन इलेक्ट्रोडच्या माध्यमातून व्हिडिओ गेमशी जोडला गेला. यावरून चेंडू कोणत्या बाजूने होता आणि पॅडपासून किती दूर होता हे कळतं. यादरम्यान पेशींनी स्वतःची विद्युत क्रिया निर्माण केली. खेळ चालू असताना पेशींनी कमी ऊर्जा खर्च केल्याचं दिसून आलं.

संबंधित बातम्या

संशोधनाचा फायदा काय? `अल्झायमरसारख्या गंभीर न्यूरोडीजनरेटिव्ह आजारांवरच्या उपचारांची चाचणी घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल,` अशी आशा डॉ. ब्रेट कॅगन यांनी व्यक्त केली आहे. यानंतर या मिनी ब्रेनच्या पोंग खेळण्याच्या क्षमतेवर अल्कोहोलमुळे काय परिणाम होतो, हे तपासण्याचं नियोजन आहे. जर तो मानवी मेंदूप्रमाणेच प्रतिक्रिया देत असेल तर ती प्रायोगिक स्टॅंड इन प्रणाली म्हणून किती प्रभावी असू शकते, हे अधोरेखित करील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या