JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / एका घड्याळामुळे टळली त्याची वाईट वेळ; Smartwatch ने वाचवला जीव

एका घड्याळामुळे टळली त्याची वाईट वेळ; Smartwatch ने वाचवला जीव

या व्यक्तीलाही याची काहीच माहिती नव्हती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 02 जुलै : घड्याळ (Watch) जे आपल्याला वेळ दाखवतं. या घड्याळाच्या काट्यावरच आपलं आयुष्य सुरू असतं. याच घड्याळ्यामुळे एका व्यक्तीची वाईट वेळ टळली आहे. चक्क घड्याळाने एका व्यक्तीचा जीव (Watch saved mans life) वाचवला आहे. एक घड्याळ (Smartwatch saved mans life) जे निर्जीव आहे, ते कसं काय बरं जीव वाचवू शकतं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? अमेरिकेतील 78 वर्षांचा माइक यागर पडले. त्यांनी तसं कुणालाही आपल्या मदतीसाठी वगैरे बोलावलं नव्हतं. पण तरी त्यांच्या मदतीसाठी आपात्कालीन सेवा धावली. समरफिल्ड अग्निशमन विभागामार्फत माइक यांना वाचवण्यात आलं. पण हे नेमकं घडलं तरी कसं, यांना कुणी बोलावलं याचा विचार माइकही करू लागला. त्याने अग्निशमन दलाला याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी आपल्याला घड्याळामार्फत आपात्कालीन संदेश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. हे वाचा -  तुमचं WhatsApp आणि Facebook इतर कोणी वापरत तर नाही ना? असं तपासा फॉक्स न्यूजशी बोलताना माइक यांनी सांगितलं, जेव्हा काही लोक मला वाचवण्यासाठी आले तेव्हा मी त्यांना सर्वात आधी विचारलं की तुम्हाला इथं यायचं हे कसं समजलं? त्यांनी सांगितलं माझ्या घड्याळाने त्यांना संदेश पाठवला होता. माइक यागर आपल्या ड्राइवव्हे मध्ये पडले होते. त्यांचं नाक तुटलं. यानंतर अॅपल वॉचला त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाली नाही, तसं अॅपल वॉचने ऑटोमॅटिकली 911  या आपात्कालीन क्रमाकांवर फोन केला. हे वाचा -  Google Meet वर विडिओ शेयर करणं झालं आता जास्त सोपं अॅपल इनसाइडर च्या रिपोर्टनुसार, आपलं घड्याळ आपात्कालीन संदेश पाठवू शकतं, याची काहीच माहिती या व्यक्तीला नव्हती. पण हे घड्याळ त्यांच्यासाठी लाइफ सेव्हिंग ठरलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या