नवी दिल्ली, 9 मार्च : Apple ने मंगळवारी एका व्हर्चुअल इव्हेंटमध्ये बहुचर्चित iPhone SE लाँच केला. अनेकांना मागील कित्येक दिवसांपासून या फोनची उत्सुकता होती. अखेर Apple SE लाँच झाला आहे. हा नवा फोन एप्रिल 2020 मध्ये आलेल्या iPhone SE चं अपग्रेड मॉडेल आहे. नवा iPhone SE 5G कनेक्टिव्हिटी आणि A15 सह लाँच करण्यात आला आहे. मागील 2020 SE मॉडेलमध्ये 4G सपोर्ट आणि A13 बायोनिक चिप होती. काय आहेत फीचर्स - नव्या iPhone SE मध्ये A15 बायोनिक चिप आहे. ही चिप iPhone 13 सीरिजवरही काम करते. iOS 15 वर हा फोन काम करतो. यात 4.7 इंची रेटिना HD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच 750x1,334 पिक्सल रेजोल्यूशन आहे. हा फोन 60fps पर्यंत 4K वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट करतो. तसंच सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी f/2.2 लेन्ससह फ्रंटला 7 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. Apple च्या या लेटेस्ट iPhone मध्ये एरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियम आणि ग्लासची डिझाइन मिळेल. फोनला मागच्या आणि पुढच्या बाजूलाही iPhone 13 आणि iPhone 13 Pro प्रमाणे ग्लास मटेरियलम मिळेल.
कॅमेरा - iPhone SE 3 मध्ये 12 मेगापिक्सलचा f/1.8 अपेर्चर असणारा वाइड कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Apple च्या या स्वस्त फोनमध्ये टच आयडी, फेस आयडी, होम बटन, लाइव्ह टेक्स्ट फीचर आणि जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे.
काय आहे किंमत - iPhone SE 3 तीन स्टोरेज वेरिएंट 64GB, 128GB आणि 256GB मध्ये लाँच करण्यात आला आहे. अमेरिकेत iPhone SE ची किंमत 429 डॉलर भारतीय रुपयानुसार 33000 रुपयांपासून सुरू आहे. तर भारतात iPhone SE ची सुरुवातीची किंमत 43,900 रुपये आहे. भारतात iPhone SE च्या 64GB बेस मॉडेलसाठी 43900 रुपये द्यावे लागतील. तर फोनच्या 128GB साठी 48,900 आणि 256GB साठी 58,900 रुपये द्यावे लागतील. iPhone SE चं बुकिंग भारतासह इतर देशात शुक्रवारपासून सुरू होणार आहे. 11 मार्च शुक्रवारपासू या फोनसाठी प्री-ऑर्डर करू शकता. 18 मार्चपासून फोन भारतात उपलब्ध होईल.