JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / अलर्ट! WhatsApp वर या मेसेजपासून सावधान; अन्यथा खाली होऊ शकतं बँक अकाउंट

अलर्ट! WhatsApp वर या मेसेजपासून सावधान; अन्यथा खाली होऊ शकतं बँक अकाउंट

WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर! मेसेजद्वारे एक लिंक देण्यात येते, ज्यावर क्लिक करून जॉईन करायला सांगितलं जातं. त्यावर क्लिक झाल्यास, बँक अकाउंट हॅक होण्याचा धोका असतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 डिसेंबर : WhatsApp जितकं फास्ट, सोयीस्कर आहे, तितकंच ते धोकादायकही होऊ शकतं. आता बँकिंग पेमेंटपर्यंतचे फीचर्स व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आल्याने अ‍ॅप अधिक सेंसेटिव्ह झालं आहे. त्यामुळेच WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर आहे. एखाद्या छोट्याच्या चुकीमुळे, मेसेजमुळे बँक खातं खाली होण्याची शक्यता निर्माण होते. सायबर क्रिमिनल whatsapp द्वारे लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर पार्ट टाईम जॉबची ऑफर पाठवली जाते. यात घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे पार्ट टाईम जॉब करून पैसे कमावले जाऊ शकतात, असा फसवणूक करणारा मेसेज पाठवला जातो. या जॉबमध्ये केवळ 10-30 मिनिटं काम करून 200 ते 3000 रुपयांपर्यंत कमाई केली जाऊ शकते. नव्या युजर्सला 50 रुपये बोनसही मिळेल असं लिहून त्याखाली एक लिंक देण्यात येते, ज्यावर क्लिक करून जॉईन करायला सांगितलं जातं. त्यावर क्लिक झाल्यास, बँक अकाउंट हॅक होण्याचा धोका असतो.

(वाचा -  तुमच्या डेटावर हॅकर्सची नजर? या 7 पद्धतींनी डेटा ठेवा सुरक्षित )

असा मेसेज आल्यास काय कराल - व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर कोणत्याही मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अशाप्रकारचा मेसेज मिळाल्यास, ज्या नंबरवरून मेसेज आला आहे, त्याला लगेचच ब्लॉक करा. त्याशिवाय तो मेसेजही डिलीट करा. फसवणूक करणारा हा पार्ट टाईम जॉबचा मेसेज अधिकतर +212 कोड असणाऱ्या नंबरवरून येतो आहे. हा मेसेज वेगवेगळ्या नंबर्सवरून पाठवला जातो. भारतातील +91 वरूनही असा मेसेज आल्यास, तोही इग्नोर करा. कारण, मोठ्या कंपन्यांच्या नावाने जॉबच्या खोट्या लिंक पाठवल्या जातात.

(वाचा -  आता Apple ची कारही येणार; मिळेल अ‍ॅडव्हान्स बॅटरी टेक्नोलॉजी )

कशी होते फसवणूक - फ्रॉड मेसेजमध्ये असलेली लिंक एक मालवेयर (Malware) असतो. लिंकवर क्लिक करताच, हा मालवेयर युजर्सच्या फोनमध्ये इंस्टॉल होतो. हा युजर्सचा एटीएम पीन, कार्ड नंबरसारख्या फायनेंशियल किंवा पर्सनल डिटेल्स मागतो. त्यानंतर अवैधपणे या डेटाचा वापर केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या