नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : दिवाळीपूर्वी टेलिकॉम कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यासाठी, आपल्या ग्राहकांना नवीन प्लान, नवीन सुविधा देत असतात. यादरम्यान आता, एयरटेलने (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी नवा प्लान जाहीर केला आहे. आता एयरटेलचे पोस्टपेड युजर्स, एक प्लान 8 युजर्स मिळून वापरु शकतात. सिंगल पोस्टपेड नंबरसह 8 ऍड-ऑन कनेक्शन - एयरटेल 399 रुपयांपासून ते 1599 रुपयांपर्यंत 5 पोस्टपेड प्लान्स आपल्या ग्राहकांना ऑफर करत आहे. कंपनीने पोस्टपेड प्लान्ससाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. आता एयरटेलचे ग्राहक सिंगल पोस्टपेड नंबरसह 8 ऍड-ऑन कनेक्शन घेऊ शकतात. 749 रुपये आणि 999 रुपयांच्या या प्लान्समध्ये युजर्सला फ्री फॅमिली ऍड-ऑन कनेक्शनचा लाभ मिळणार आहे. 749 आणि 999 रुपयांचा प्लान घेणारे ग्राहक आपल्या कनेक्शनसह 8 ऍड-ऑन कनेक्शन घेऊ शकणार आहेत. (वाचा - Airtel युजर्ससाठी कंपनीची घोषणा; आता फ्रीमध्ये मिळणार ही सुविधा ) फॅमिली पोस्टपेड प्लान - एयरटेलच्या 749 रुपयांच्या प्लानमध्ये दोन फ्री ऍड-ऑन कनेक्शनची सुविधा आहे. ज्यात एक रेग्युलर (व्हॉईस+डेटा) आणि दुसरं केवळ डेटा ओनली कनेक्शन मिळतं. तर 999 रुपये फॅमिली पोस्टपेड प्लानसह ग्राहकांना चार फ्री ऍड-ऑन नंबर ऍड करता येणार आहेत. ज्यात 3 रेग्युलर (व्हॉईस+डेटा) आणि एक डेटा ओनली कनेक्शन असू शकतं. कंपनी 749 रुपयांच्या प्लानमध्ये 125 जीबी डेटा ऑफर करते. या प्लानमध्ये 200 जीबीपर्यंतचा डेटा रोलओवरचा फायदाही ग्राहकांना मिळू शकतो. (वाचा - ‘Despacito’ ही पडलं मागे! 700 कोटी रेकॉर्डब्रेक व्ह्यूज असणारा VIDEO पाहिला का? )