JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / कोरोनातून बरं झाल्यानंतर हे Smartwatch ठरेल फायदेशीर; आरोग्याच्या समस्यांविषयी देईल अलर्ट

कोरोनातून बरं झाल्यानंतर हे Smartwatch ठरेल फायदेशीर; आरोग्याच्या समस्यांविषयी देईल अलर्ट

आता असं स्मार्टवॉच (Smartwatch) आलं आहे जे, की रुग्णांना वेळीच आरोग्यविषयी माहिती देऊन सतर्क करेल. ॲपल (Apple) कंपनीचं हे वॉच कोरोनातून बरं झाल्यानंतर आरोग्याकडे लक्ष ठेवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

जाहिरात

घड्याळामुळे टळली त्याची वाईट वेळ.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 जुलै : कोविड-19 (Covid-19) मधून बरे झाल्यानंतरही काही दिवस रुग्णांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी वेळोवेळी डॉक्टरकडे जावं लागतं. मात्र आता असं स्मार्टवॉच (Smartwatch) आलं आहे जे, की रुग्णांना वेळीच आरोग्यविषयी माहिती देऊन सतर्क करेल. ॲपल (Apple) कंपनीचं हे वॉच कोरोनातून बरं झाल्यानंतर आरोग्याकडे लक्ष ठेवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. ॲपल कंपनीच्या वॉचने आतापर्यंत अनेक युजरच्या आरोग्याची स्थिती ओळखण्यास मदत केली आहे. परिणामी युजरचे प्राण देखील वाचण्यास मदत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या वॉचद्वारे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा त्रास होत असल्यास वेळीच अलर्ट मिळतो. पण आता हे वॉच कोरोनातून बरे झाल्यानंतर सुद्धा सतर्क करेल. टीव्ही 9 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, एका नव्या अभ्यासातून समोर आलं आहे, की ॲपल वॉच, फिटबिट (Fitbits) स्मार्टवॉच आणि इतर कंपन्यांची वॉच आता कोरोनामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत आपल्याला सतर्क करतात. आपली कोविड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही आपल्याला काही दिवस त्रास होऊ शकतो. त्यावेळी या स्मार्टवॉचचा फायदा होऊ शकतो. न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, जामा नेटवर्कमध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासात असं दिसून आलं, की कोविड-19 मधून बरं झालेल्या लोकांच्या वर्तणुकीमध्ये आणि शरीरात बदल दिसून येतात. कोविडमधून बरे झाल्यानंतर या वेअरेबल्सद्वारे युजर आरोग्याची स्थिती वेळोवेळी तपासू शकतात. तसंच यामुळे रुग्णांना कोविडमधून आपण कशाप्रकारे बरे होत आहोत, आरोग्याची स्थिती कशाप्रकारे सुधारत आहे, यावर लक्ष ठेवता येईल. कारण या वॉचच्या मदतीने श्वसनाची गती, शरीराचं तापमान, शारीरिक हालचाल आणि इतर घटकांवर लक्ष ठेवता येतं. स्कूल ऑफ मेडिसिनमधील वेअरेबल्स गॅस्ट्रोइंडॉलॉजिस्ट रॉबर्ट हिर्टन यांनी सांगितलं, की हा एक महत्वपूर्ण अभ्यास होता. कारण या वेअरेबल्सद्वारे आपल्याला समजू शकेल की कोरोनातून बरे झाल्यानंतर आपल्या शरीरावर कोविड कशाप्रकारे परिणाम करतो.

(वाचा -  तुमच्या कामाची बातमी! Driving करताना चालानपासून वाचण्यासाठी डाउनलोड करा हे Apps )

कोरोनातून बरे झाल्यानंतरही लोकांमध्ये दिसले असे परिणाम - डिजिटल एंगेजमेंट अँड ट्रॅकिंग फॉर अर्ली कंट्रोल अँड ट्रीटमेंट (DETECT) ट्रायलचा डेटा शास्त्रज्ञांकडून तपासला जात आहे. मार्च 2020 ते जानेवारी 2021 पर्यंत या कालावधीमध्ये याचा अभ्यास करण्यात आला. ट्रायलसाठी Fitbits, Apple Watches वापरणाऱ्या सुमारे 37,000 लोकांना सहभागी करून घेतलं होतं. लोकांना मायडाटा हेल्प्स रिसर्च (MyDataHelps) अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या ॲपल आणि फिटबिट स्मार्टवॉचद्वारे आरोग्यविषयक माहिती मिळवण्याची सहमती घेतली. युजरना कोविड-19 संबंधित लक्षणं आणि कोविड-19 टेस्टचा रिपोर्टबद्दल सुद्धा विचारण्यात आला. या अभ्यासात असं दिसून आलं, की कोविडमधून बऱ्या झालेल्या नागरिकांमध्ये श्वसनाचा दर जास्त होता. तो प्रति मिनिट पाच बीटपेक्षा जास्त होता. बहुतेक रूग्णांमध्ये, कोविडमधून बरे झाल्यानंतर दोन-तीन महिने अशी स्थिती कायम होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या