JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / ...तर भारतात रात्रीच्या वेळी पूर्णपणे बंद राहणार WhatsApp? जाणून घ्या काय आहे सत्य

...तर भारतात रात्रीच्या वेळी पूर्णपणे बंद राहणार WhatsApp? जाणून घ्या काय आहे सत्य

इंटरनेट आणि सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे सतत या गोष्टींचा वापर करणाऱ्या युजर्सना थोडा वेळ जरी ही सेवा बंद झाली तर अस्वस्थ होतं. विचार करा दररोज रात्री नेहमीच्या वापरातील WhatsApp बंद झालं तर? असा SMS अनेक ग्राहकाना फॉरवर्ड केला जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 ऑक्टोबर: इंटरनेट आणि सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे सतत या गोष्टींचा वापर करणाऱ्या युजर्सना थोडा वेळ जरी ही सेवा बंद झाली तर अस्वस्थ होतं. आधीच्या काळात वीज गेल्यावर जसं काय करायचं? हा प्रश्न पडायचं तसंच काहीसं होतं. मग उपाय शोधले जायचे. तसंच इंटरनेट नसलं किंवा व्हॉट्सअॅप नसेल तर अवघड होतं सोमवारी काही काळ असंच घडलं. जगभरातील फेसबुक (Facebook Outage in October), इन्स्टाग्राम ( Instagram) आणि व्हॉट्सअॅपची (WhatsApp) सेवा सोमवारी सहा तासांहून अधिक काळ बंद पडली होती. भारतात सोमवारी रात्री 9 वाजल्यापासून फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाली. यामुळे युजर्स गोंधळून गेले. सुरुवातीला काय झालं हेच नक्की कुणाला समजत नव्हतं. डेस्कटॉप तसंच मोबाइलवर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप काम करत नव्हतं. त्यामुळं अनेक युजर्सनी एकमेकांशी संपर्क साधला. त्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप ठप्प असल्याचं समोर आलं. Jio च्या या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, मोफत मिळणार अनलिमिटेड Internet या प्रकारानंतर आता यासंबंधीचा एक ऑडिओ संदेश (Viral audio message on WhatsApp) व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओ संदेशात भारतात व्हॉट्सअॅप बंद ठेवण्याचा दावा केला जात आहे. केंद्र सरकारने दररोज 11:30 ते सकाळी 6:00 पर्यंत व्हॉट्सअॅप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅपवरील वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असं या व्हायरल ऑडिओ संदेशात सांगितलं जात आहे. व्हायरल मेसेजमध्ये पुढं असंही म्हटलं आहे की, जर तुम्ही हा मेसेज किमान 10 लोकांना फॉरवर्ड केला नाही तर 48 तासांत तुमचं व्हॉट्सअप अकाउंट अवैध मानलं जाईल आणि ते बंद केलं जाईल. अकाउंट डिलिट केल्यानंतर व्हॉट्सअॅप सुरू करण्यासाठी दरमहा 499 रुपये शुल्क आकारलं जाईल. विनामूल्य सेवा सुरू ठेवण्यासाठी किमान 10 लोकांना हा संदेश फॉरवर्ड करा. हा मेसेज काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला. व्हॉट्सअॅप बंद होणार असल्याने युजर्सही नाराज झाले. पुन्हा FB-WhatsApp ठप्प झालं तर? हे आहेत Best पर्याय, नाही तुटणार जगाशी संपर्क अनेक युजर्स ह्या मेसेजमधील दाव्याची पडताळणी करत होते. त्यानंतर हा मेसेज फेक असल्याचं उघडकीस आलं. व्हायरल ऑडिओ मेसेजमध्ये व्हॉट्सअॅप बंद होण्याचा केलेला हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. व्हॉट्सअॅपबाबत सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. हा मेसेज खोटा असल्याने युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. हा मेसेज दोन वर्षांपूर्वीही व्हायरल झाला होता. त्यानंतर हा मेसेज पुन्हा व्हायरल होत आहे. नुकतंच व्हॉट्सअॅप काही काळ बंद पडले. त्यामुळे युजर्स व्हॉट्सअॅप 6 तास वापरू शकले नाहीत. त्यामुळे अनेकांना वाटू लागलं की व्हॉट्सअॅप बंद पडलं आहे. जेव्हा व्हॉट्सअॅप पुन्हा सुरू झालं तेव्हा काही नतद्रष्ट लोकांनी हा फेक संदेश (Viral fake message) पसरवायला सुरुवात केली. राऊटर कॉन्फिगरेशनमध्ये गडबड झाल्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप काम करत नव्हतं, असं कंपनीने म्हटलं आहे. सोमवारी रात्री 9 वाजता बंद पडलेल्या या सेवा पहाटे 4 वाजता सुरु झाल्या. यूजर्सला झालेल्या गैरसोयीबद्दल फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या