नवी दिल्ली, 26 डिसेंबर : OPPO Reno 5 Pro+ 5G स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा ओप्पो Reno 5 सीरीजचा भाग आहे. याच महिन्यात कंपनीने या सीरीजचे आणखी दोन स्मार्टफोन OPPO Reno 5 Pro आणि Reno 5 लाँच केले होते. Reno 5 Pro+ 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. Reno 5 Pro+ चं डिझाईन Reno 5 Pro शी मिळतं जुळतं आहे. OPPO Reno 5 Pro+ 5G च्या 8GB + 128GB वेरिएंटची किंमत चीनमध्ये RMB 3,999 म्हणजेच जवळपास 45,000 रुपये आहे. तर 12GB + 256GB वेरिएंटची किंमत RMB 4,499 म्हणजेच 50,600 रुपये इतकी आहे. हा फोन स्टार रिवर ड्रीम आणि फ्लोटिंग नाईट शॅडो कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. चीनमध्ये 29 डिसेंबरपासून याची विक्री सुरू होणार आहे. सध्या OPPO Reno 5 Pro+ 5G च्या भारतातील लाँचिंगबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु एका टिप्स्टरनुसार, कंपनी Reno 5 Pro आणि Reno 5 पुढच्या महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. OPPO Reno 5 Pro+ 5G स्पेसिफिकेशन्स - - अँड्रॉईड 11 बेस्ड ColorOS 11 - 6.55 इंची FHD+ पंच होल AMOLED डिस्प्ले - 12GB रॅमसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर - 4,500mAh बॅटरी - 65W SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट कॅमेरा - मिळालेल्या माहितीनुसार, या फोनचा कॅमेरा या फोनची सर्वात खास बाब आहे. oppo reno 5 pro जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल, जो 50 मेगापिक्सल सोनी IMX7xx सीरीज लेन्ससह आहे. OPPO Reno 5 Pro+ 5G स्मार्टफोनला रियरमध्ये 50MP Sony IMX766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. 16MP अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर, 13MP टेलिफोटो कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 32MP कॅमेरा असून सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.