JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / पॉकेट फ्रेंडली स्पेशल सायकल, पायडल न मारता चालणार 80 किलोमीटर, पाहा Video

पॉकेट फ्रेंडली स्पेशल सायकल, पायडल न मारता चालणार 80 किलोमीटर, पाहा Video

ही सायकल चार्ज करण्यासाठी फक्त दोन युनिट खर्च होतील.

जाहिरात

पॉकेट फ्रेंडली स्पेशल सायकल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शक्ति सिंह, प्रतिनिधी कोटा, 7 जून : इलेक्ट्रिक बाईक, कार किंवा स्कूटीबद्दल तुम्ही खूप ऐकले असेल. तसेच तुम्ही ते वापरलेही असावे. मात्र, ही सर्व वाहने विद्यार्थ्यांच्या खिशाला अनुकूल नाहीत. याचे कारण त्यांची किंमत जास्त असते. त्यामुळे ते विकत घेण्यासाठी विद्यार्थी जास्त पैसे खर्च करू शकत नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांना कोचिंगमधून वसतिगृहात जाण्यासाठी दुचाकी नक्कीच लागते. विद्यार्थ्यांच्या या गरजा लक्षात घेऊन कोटा येथील एका बारावी उत्तीर्ण तरुणाने एक खास सायकल तयार केली आहे. ही सायकल पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे आणि एक वेळा चार्ज केल्यावर सुमारे 80 किलोमीटर चालते. सायकलची रचना करणाऱ्या वीरेंद्र शुक्ला यांनी सांगितले की, या सायकलमध्ये इंटीग्रेटेड इलेक्ट्रिक मोटर आहे. वीज पुरवण्यासाठी ती वापरली जाते. सायकलमध्ये रिचार्जेबल बॅटरी बसवण्यात आली आहे. साधारणपणे ही सायकल 25 ते 30 किमी/ताशी वेगाने धावते. सायकल दैनंदिन कामांसाठी खूप चांगली आहे आणि जर सायकल इलेक्ट्रिक असेल तर ती चालवायला हरकत नाही किंवा खिशावर डिझेल-पेट्रोलचे वजनही पडत नाही.

सायकल बनवायला लागले 25 हजार रुपये - वीरेंद्र शुक्लाने सांगितले की, इलेक्ट्रिक साइकिल एक वेळा फुल चार्ज केल्यावर 70 ते 80 किलोमीटर पर्यंत चालते. तिला चार्ज करण्यासाठी फक्त दोन युनिट खर्च होतील. ही सायकल बनवण्यासाठी 25 हजार रुपये खर्च आला आहे. तसेच कोटामध्ये शिकण्यासाठी येणारे लाखो कोचिंग विद्यार्थी वसतिगृह आणि घरी जाण्यासाठी सायकल वापरतात. अशा परिस्थितीत ही सायकल त्या विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी 70,000 ते 80,000 रुपये खर्च येतो. या तुलनेत ही एक इलेक्ट्रिक सायकल 25,000 रुपयांना मिळेल. आता तो कोचिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रिक सायकल देखील घेऊन जात आहे. शुक्लाचा Gear-EV वर्कशॉप कोटामधील अनंतपुरा भागात आहे. तुम्हालाही जर या सायकलबाबत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही 9454009819 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साध शकता. तुम्ही याबाबतची संपूर्ण माहिती मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या