नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ 18 गुणांसह प्लेऑफ (PL 2020 Play Offs) गाठणारा पहिला संघ ठरला आहे. मुंबईनं 13 पैकी 9 सामने जिंकत शानदार कामगिरी केली आहे. मात्र कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावे लागले. यातच युवराज सिंगने (Yuvraj Singh) हिटमॅन रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्या जाडेपणावरून खिल्ली उडवली आहे. मुंबई इंडियन्सनं रोहित आणि ऋषभ पंत यांचा एक फोटो शेअर करत रोहित आणि पंतमध्ये सिक्स मारण्याच्या स्पर्धेची वाट पाहत आहोत, असे कॅप्शन दिले. मात्र यावर युवराजनं मजेशीर कमेंट केली. युवराजनं, “ही स्पर्धा जाडेपणाची आहे. रोहित पंतला विचारत असेल, तुझे गाल जास्त जाड आहेत की माझे”, अशी कमेंट केली. वाचा- हो हे शक्य आहे! आज RCB आणि दिल्ली दोघंही गाठणार प्लेऑफ युवराज सिंगचे हे ट्वीट खूप व्हायरल झाले. काही लोकांना रोहित शर्मावर टीका केली म्हणून युवराजला ट्रोल केले. युवराजनं हे ट्वीट डिलीट केले आहे.
दुसरीकडे दुखापतीमुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून गेले 3 सामने खेळू शकला नाही आहे. तर, येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही रोहितला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. मात्र रोहित फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. वाचा- खेळाडूंमुळे नाही तर अम्पायरमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचं स्वप्न भंगल!
वाचा- IPL 2020 : कार्तिकचा तरुणाला लाजवेल असा भन्नाट कॅच, पाहा VIDEO रोहितच्या दुखापतीबाबत त्यानं अद्याप माहिती दिली नसली तरी, त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. दुसरीकडे पंतलाही असाच त्रास सहन करावा लागला, परिणामी पंतही दिल्लीकडून 2 सामने खेळू शकला नव्हता. आज पंतच्या दिल्लीचा अखेरचा मुकाबला RCBशी होणार आहे. प्लेऑफ गाठण्यासाठी मुंबईला हा सामना जिंकावाच लागेल.