JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भारतीयांंनो इकडे लक्ष द्या! हरमनप्रीत कुठेय? रोहित-हार्दिकचा फोटो शेअर करत युवीचा प्रश्न

भारतीयांंनो इकडे लक्ष द्या! हरमनप्रीत कुठेय? रोहित-हार्दिकचा फोटो शेअर करत युवीचा प्रश्न

मुंबई, 23 फेब्रुवारी : हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या या वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाशी असणार आहे. पाचवेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने हरमनप्रीतसाठी एक कँपेन सुरू केलं आहे. युवराज सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असं सर्च केल्यावर फक्त रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या असं दिसत असल्याचं म्हटलंय.

जाहिरात

harmanpreet rohit sharma hardik pandya

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 फेब्रुवारी : हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या या वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाशी असणार आहे. पाचवेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने हरमनप्रीतसाठी एक कँपेन सुरू केलं आहे. युवराज सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असं सर्च केल्यावर फक्त रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या असं दिसत असल्याचं म्हटलंय. युवराज सिंह म्हणाला की आपण हे कधी सुधारणार आहे. माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानेही यावर भाष्य केलं आहे. त्यानेही लोकांना या कँपेनमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. हेही वाचा :  कसोटी डेब्युआधी चक्रीवादळाने घर नेलं, LIVE पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला क्रिकेटर युवराज सिंगने म्हटलंय की, भारतीय महिला संघाच्या कर्णधाराचे नावही सर्च रिजल्टमध्ये दिसायला हवं. जर आपण हे तयार केलं आहे तर हे सुधारण्याची क्षमताही आपल्यात आहे. महिला क्रिकेटसाठी आपण असं करायला हवं.

संबंधित बातम्या

युवराज सिंहने जो व्हिडीओ शेअऱ केला आहे त्यात म्हटलंय की, भारतीयांनो थोडं इकडे लक्ष द्या. गुगलवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सर्च करा. फक्त रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचे नाव, फोटो दिसतो. कर्णधार हरमनप्रीत कुठे आहे? असा प्रश्न युवराजने विचारलाय. हरमनप्रीत कौरने वयाच्या २० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. २००९ मध्ये तिने पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळला होता. २०१२ च्या महिला टी२० आशिया कपच्या अंतिम सामन्यात तिने भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा भारताची कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार झुलन गोस्वामी दुखापतीमुळे बाहेर होते. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया कपही जिंकला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या