JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / धक्कादायक! पराभव झाला नाही सहन, अन् क्रिकेटपटूनं मैदानातच सोडला जीव

धक्कादायक! पराभव झाला नाही सहन, अन् क्रिकेटपटूनं मैदानातच सोडला जीव

पराभव झाला नाही सहन, सामना संपताच क्रिकेटपटूच्या आयुष्याचा असा झाला शेवट.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ललितपूर (उत्तर प्रदेश), 17 जानेवारी : उत्तर प्रदेशच्या ललितपूर, गिरार येथल खुतागुवान खेड्यातील रहिवासी असलेल्या एका युवकाचा क्रिकेट सामन्यानंतर मृत्यू झाला. आपल्या संघाचा पराभव सहन न झाल्याचा खेळाडूला धक्का बसला आणि सामन्यादरम्यानच तो जमिनीवर पडला. संघातील इतर खेळाडूंनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र डॉक्टरांनी त्याचा उपचाराआधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. डॉक्टरांनी या युवकास हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचे सांगितले. वाचा- 6 षटकांत पाहिजे होत्या 83 धावा, पठ्ठ्याने 9 चेंडूतच फिरवला सामना; पाहा VIDEO खुटागव्हाण येथे राहणारा 24 वर्षीय गौरव राजा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. गौरव आपल्या आई-वडिलांना शेतात मदतही करायचा. बुधवारी जेवण झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसमवेत क्रिकेट सामना खेळण्यासाठी गेला. मात्र आपल्या संघाचा पराभव होत आहे हे गौरवला सहन झाले नाही. गौरव खूप अस्वस्थ झाला, त्यानंतर तो अचानक जमिनीवर कोसळला. वाचा- टीम इंडियासाठी खुशखबर! भारताच्या स्टार गोलंदाजावर लंडनमध्ये झाली यशस्वी सर्जरी बेशुद्ध पडलेल्या गौरवला पाहून इतर खेळाडूही घाबरले. नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर सहकारी खेळाडूंनी त्याला मादावार्‍यातील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. येथे डॉक्टरांनी गौरवला मृत घोषित केले. वाचा- विराट, रोहित आणि बुमराहची चांदी; तर धोनीला दररोज 2 लाखांचा फटका संघाच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, गौरवच्या संघाला विजयासाठी शेवटच्या दोन षटकांत फक्त एक धाव आवश्यक होती, परंतु तो फलंदाजाचा एक धाव काढता आली नाही. परिणामी गौरवच्या संघानं हा सामना गमावला. यानंतर अचानक गौरवची प्रकृती खालावली. या घटनेनंतर क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या