JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / David Warner चा हिटमॅन रोहित शर्मावर चोरीचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?

David Warner चा हिटमॅन रोहित शर्मावर चोरीचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?

टी-20 वर्ल्ड कप (T20 Worldcup) मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मावर चक्क चोरीचा आरोप केला.

जाहिरात

David Warner

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 18 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कप (T20 Worldcup) मध्ये हिटमॅन रोहित शर्माच्या (Rohit Sharma)बॅटची जादु अद्याप पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या बॅटिगची चर्चा न रंगता एक वेगळीच चर्चा रंगली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने रोहितवर चक्क चोरीचा आरोप(You are copying my tik tok style) केला आहे. त्यामुळे रोहितच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. रोहितने नेमकं काय वॉर्नरच काय चोरलं असा सवाल उपस्थित होतं आहे. टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे 13 ऑक्टोबर ला अनावरण झाले. त्यानंतर अनेक खेळाडूंनी ही जर्सी परिधान करुन नवा लुक सोशल अकाऊंट्स वर शेअर केले आहेत. यामध्ये रोहित शर्मादेखील आहे. नुकतचं रोहितने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा त्याच्या हॉटेलच्या खोलीत दिसत आहे. त्याने एका वेगळ्याच स्टाईलमध्ये टीम इंडियाची नवी वर्ल्ड कप जर्सी परिधान केली आहे. या व्हिडीओवर वॉर्नरने गंमतीदार कमेंट केली आहे.

संबंधित बातम्या

रोहितच्या पोस्टवर कमेंट करच वॉर्नरने, ‘तू माझ्या टिक टॉक स्टाईलची कॉपी करत आहेस’. असे म्हटले आहे. रोहित शर्माच्या या पोस्टवर, डेव्हिड वॉर्नरने त्याच्यावर त्याच्या टिक-टॉक स्टाईलची कॉपी केल्याचा आरोप केला आहे, तर युजवेंद्र चहल बेडबाबत कमेंट केली आहे. टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. भारत हा सुपर 12 मध्ये असल्याने सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यात भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. पण तत्पूर्वी सराव म्हणून भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघासोबत भिडणार आहे. यातीलच एक सामना काल दुबईच्या मैदानात पार पडला. ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड (India vs England) आमने-सामने होते. या सामन्यात भारताने 7 गडी विजयाची सुरुवात केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या