JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final : आणि विराट मैदानातच भांगडा करायला लागला

WTC Final : आणि विराट मैदानातच भांगडा करायला लागला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या टीमने आपली पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा ऑल आऊट केल्यानंतर न्यूझीलंडचे ओपनर टॉम लेथम (Tom Latham) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांनी टीमला सावध सुरूवात करून दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साऊथम्पटन, 20 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या टीमने आपली पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा ऑल आऊट केल्यानंतर न्यूझीलंडचे ओपनर टॉम लेथम (Tom Latham) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांनी टीमला सावध सुरूवात करून दिली. तिसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंत न्यूझीलंडने एकही विकेट गमावली नाही, त्यांनी 36 रनवर एकही विकेट गमावली नव्हती. इशांत शर्मा (Ishant Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांनी उत्कृष्ट बॉलिंग केली असली तरी त्यांना यश मिळालं नाही, त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) त्याच्या नेहमीच्या शैलीत जल्लोष करता आला नाही. असं असलं तरी त्याने मैदानावर भांगडा केला. साऊथम्पटनच्या मैदानावर 4 हजार प्रेक्षकांना सामना बघायला परवानगी आहे, त्यामुळे भारतीय चाहते ढोल घेऊन मॅच बघण्यासाठी मैदानात आले होते. चाहते ढोल वाजवत असल्याचं पाहून विराटलाही आवरलं नाही आणि त्याने भांगडा करायला सुरुवात केली. भारताची बॅटिंग गडगडली रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केल्यानंतरही भारताची बॅटिंग गडगडली. मॅचच्या तिसऱ्या दिवशी भारताचा 217 रनवर ऑल आऊट झाला. न्यूझीलंडच्या काईल जेमिसनने भारताच्या 5 विकेट घेतल्या, तर बोल्ट आणि वॅगनरला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. टीम साऊदीला एक विकेट घेण्यात यश आलं. भारताने आजच्या दिवसाची सुरुवात 146/3 अशी केली होती, पण विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या दिवशी एकही रन न करता माघारी परतला. जेमिसनने विराटला 44 रनवर एलबीडब्ल्यू केलं. विराटची विकेट गेल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 49 रनवर, ऋषभ पंत 4 रनवर आणि आर. अश्विन 22 रनवर आऊट झाले. अजिंक्यला वॅगनरने, पंतला जेमिसनने आणि अश्विनला साऊदीने माघारी पाठवलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या