चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला, शुभमन गिलला का झाला 115 टक्के दंड?
मुंबई, 12 मे : लंडन येथील ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवण्यात आली. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपदं पटकावले. या सामन्यात आयपीएल 2023 मध्ये तब्बल 3 शतक ठोकणारा शुभमन गिल फलंदाजीत मात्र फ्लॉप ठरला. तसेच शुभमन गिलने केलेल्या एका चुकीमुळे त्याला आयसीसीने त्याच्या मॅच फीवर तब्बल 115 टक्के दंड ठोठावला. 7 ते 11 जून या दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल मुकाबला रंगला होता. परंतु यासामन्यावर सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व होते. ऑस्ट्रेलियाने फलंदाजीच्या पहिल्या डावात 469 धावा करून आघाडी घेतली, तर भारत ही आघाडी मोडू शकला नाही आणि 296 धावांवर सर्वबाद झाला. तर फलंदाजीचाय दुसऱ्या डावात देखील ऑस्ट्रेलियाने 270 धावा केल्या, पण ऑस्ट्रेलियाने उभारलेला धावांचा डोंगर भारताला पार करता आला नाही त्यामुळे भारताचा तब्बल 209 धावांनी पराभव झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर आयसीसीकडून टीम इंडियाला आणि टीम ऑस्ट्रेलियाला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला. आयसीसीच्या नियम क्रमांक 2.22 नुसार प्रत्येक ओव्हरला 20 टक्के मॅच फी ही कापली जाते. तेव्हा टीम इंडियाने फायनलमध्ये निर्धारित वेळेपेक्षा 5 ओव्हर कमी टाकल्या तर ऑस्ट्रेलियाने 4 ओव्हर कमी टाकल्या होत्या. यावरून टीम इंडियाला मॅच फीच्या 100 टक्के तर ऑस्ट्रेलियाला मॅचच्या 80 टक्के दंड आकारण्यात आला. यामुळे टीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूला आणि सपोर्ट स्टाफला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची खेळल्यावर मिळणाऱ्या मॅच फीचा एकही रुपया मिळणार नाही.
शुभमन गिलला का ठोठावला दंड? फायनल सामन्यात टीम इंडियाकडून दुसऱ्या डावाची फलंदाजी करण्यासाठी भारताचा सलामी फलंदाज शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोघे मैदानात उतरले. यावेळी सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये शुभमन आणि रोहितने मैदानावर चांगला जम बसवला होता. पण तेवढयात 8 व्या ओव्हरमध्ये स्कॉट बोलँडने टाकलेल्या बॉलवर शुभमन गिल कॅच आउट झाला. ऑस्ट्रेलियाच्या कॅमरन ग्रीनने शुभमनचा कॅच पकडला, परंतू कॅच पकडताना त्याच्या हातातील बॉलचा संपर्क जमिनीशी झाल्याचे डीआरएस घेतल्यावर निदर्शनास आले. पण तरी देखील तिसऱ्या अंपायरने शुभमनला बाद घोषित केले. क्रिकेटप्रेमींसाठी मोठी अपडेट! ‘या’ दिवशी वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान भिडणार शुभमन बाद झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी कॅच संबंधित व्हिडिओ आणि फोटो शेअर करून कॅमरन ग्रीनला ट्रॉल केले आणि ही अनफेअर अंपायरिंग असलयाचे सांगितले. सामन्याचा चौथा दिवस संपल्यानंतर शुभमन गिलने देखील आपल्या ट्विट वरून हा वादग्रस्त कॅच संदर्भात एक ट्विट केले आणि ते काही काळातच व्हायरल झाले. परंतु आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अंपायरने एकदा निर्णय दिल्यावर त्याविरोधात खेळाडूने सोशल मीडियावरून भाष्य करणे हे आयसीसीच्या नियम क्रमांक 2.7 नुसार चुकीचे आहे. तेव्हा या चुकीसाठी आयसीसीने शुभमन गिलला मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठवला. अशा प्रकारे टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंवर स्लो ओव्हर रेटमुळे मॅच फीवर ठोठवण्यात आलेला 100 टक्के दंड आणि शुभमनने ट्विट करून केलेल्या चुकीमुळे केलेला 15 टक्के दंड. असा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी शुभमन गिलकडून एकूण 115 टक्के दंड आकारण्यात आला. त्यामुळे ही मॅच खेळल्याबद्दल शुभमन गिलला एक रुपयाही मिळाला नाही तर उलट स्वतःच्या खिशातून दंडासाठी अधिकचे पैसे देखील भरावे लागले.