JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Finalमध्ये भारताची एन्ट्री जवळपास निश्चित, ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं

WTC Finalमध्ये भारताची एन्ट्री जवळपास निश्चित, ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं

सलग दोन पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ पॉइंट टेबलमध्ये टॉपला आहे. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघ आहे. पण दोन्ही संघांमधील पॉइंटचे अंतर कमी झाले आहे.

जाहिरात

ind vs aus

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 19 फेब्रुवारी : भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत पहिले दोन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढवलं आहे. दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह ४ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली आहे. भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेतील जय पराजयावर संघाच्या पॉइंट टेबलमधील स्थानावर फरक पडताना दिसत आहे. सलग दोन पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ पॉइंट टेबलमध्ये टॉपला आहे. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघ आहे. पण दोन्ही संघांमधील पॉइंटचे अंतर कमी झाले आहे. भारताला आता थेट अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी उर्वरित दोन्ही कसोटीपैकी एक सामना जिंकावा लागेल. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला तर तो अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात. हेही वाचा :  हिटमॅनने 100वी कसोटी खेळणाऱ्या पुजारासाठी केला त्याग, VIDEO VIRAL दुसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाचे १६ कसोटीत ७०.८३ टक्के गुण होते. त्यांनी १० सामने जिंकले होते तर २ सामन्यात पराभव झाला होता. आता तिसरा सामना त्यांनी गमावला. यामुळे विजयाची टक्केवारी ६६.६७ टक्क्यांवर खाली आली. भारताचे दुसऱ्या सामन्याआधी ६१.६७ टक्के गुण होते. सामना जिंकल्यानंतर हीच टक्केवारी ६४.०६ टक्के इतकी झालीय. भारताने १६ सामन्यात १० विजय मिळवले असून ४ सामने गमवावे लागले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ जर भारताविरुद्धचे दोन्ही सामने हरला तर त्यांचे ५९.६५ टक्के गुण होतील. श्रीलंकेचा संघ सध्या ५३.३३ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यांची अखेरची मालिका न्यूझीलंडविरुद्ध आहे. यात जर दोन्ही सामने लंकेने जिंकले तर त्यांचे गुण ६१.११ टक्के इतके होतील आणि ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत येतील. हेही वाचा :  अश्विनची दहशत, स्मिथला घाबरवलं; विराट कोहलीला आवरेना हसू, VIDEO VIRAL ऑस्ट्रेलियाने मालिकेत चारही सामने गमावले तरी ते अंतिम सामन्यात पोहोचू शकतील. मात्र जर तरच्या समीकरणावर त्यांना अवलंबून राहावं लागेल. न्यूझीलंडमध्ये लंकेने १-० ने मालिका जिंकली तर त्यांचे फक्त ५५.५६ टक्के गुण होतील आणि श्रीलंका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेतून बाहेर पडेल. फक्त ३ संघच आता फायनलच्या शर्यतीत उरले आहेत. दक्षिण आफ्रिका या स्पर्धेतून बाहेर पडलेय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगामात भारत अंतिम सामन्यात पोहोचला होता. पण न्यूझीलंडकडून भारताला पराभूत व्हावं लागलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या