JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Wrestlers Protest : अमित शहांच्या भेटीनंतर साक्षी, विनेश आणि बजरंगचा मोठा निर्णय, आंदोलन मागे पण...

Wrestlers Protest : अमित शहांच्या भेटीनंतर साक्षी, विनेश आणि बजरंगचा मोठा निर्णय, आंदोलन मागे पण...

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात आंदोलन करत असलेल्या पैलवानांनी अमित शहांच्या भेटीनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे.

जाहिरात

अमित शहांच्या भेटीनंतर साक्षी, विनेश आणि बजरंगचा मोठा निर्णय, आंदोलन मागे पण...

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 5 जून : भारतीय कुस्ती महासंघाचे  माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात अनेक महिन्यांपासून सुरू असलेलया पैलवानांच्या आंदोलनात आता एक मोठा ट्विस्ट आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्यावर आंदोलनातील प्रमुख पैलवान  साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया या तिघांनी रेल्वेच्या नोकरीवर परतण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी आंदोलन करत असलेल्या पैलवानांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीच्या दोन दिवसानंतर ऑलम्पिक पदक विजेती आणि पैलवानांच्या आंदोलनाततील प्रमुख  पैलवानांपैकी एक असणारी साक्षी मलिकने तिची रेल्वेतील नोकरी पुन्हा जॉईंट करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार ती आज ड्युटीवर रुजू देखील झाली आहे. तर साक्षी मलिकने घेतलेल्या या निर्णयानंतर पैलवान विनेश फोगट आणि बजरंग पुनिया या दोघांनी देखील आपल्या नोकरीवर परतण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात पैलवानांचे आंदोलन सुरूच राहणार अशी माहिती पैलवानांनी दिली आहे. रोहितनंतर टेस्ट कॅप्टन कोण? 4 नावे चर्चेत पण तिघे संघाबाहेर तर एकाला खेळायचंच नाही महिला पैलवान साक्षी मलिकने ट्विट करत लिहिले की, “ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आमच्यापैकी कोणीही मागे हटले नाही आणि हटणार देखील नाही. सत्याग्रहासोबतच मी रेल्वेतील माझी जबाबदारी पारपाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. कृपया कोणत्याही चुकीच्या बातम्या पसरवू नका”.

काही महिला पैलवानांनी भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते, तसेच त्यांच्या अटकेची मागणी देखील केली होती. काही दिवसांपूर्वी जंतर मंतरवर सुरु असलेल्या या आंदोलनाला पोलिसांनी बळाचा वापर करून हटकले होते. ज्याच्यानंतर याकारवाई विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी पैलवानांनी हरिद्वार येथे जाऊन गंगा नदीत जिंकलेले मेडल अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यावेळी शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी पैलवानांना असे करण्यापासून रोखले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या