JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final च्या तयारीसाठी इंग्लंडला गेला भारतीय खेळाडू, पण ठरला फेल

WTC Final च्या तयारीसाठी इंग्लंडला गेला भारतीय खेळाडू, पण ठरला फेल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) 18 ते 22 जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये होणार आहे. या मॅचच्या तयारीसाठी हनुमा विहारी इंग्लंडला काऊंटी खेळण्यासाठी गेला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) 18 ते 22 जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये होणार आहे. टेस्ट क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी आयसीसीकडून पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. फायनलमध्ये भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) खेळेल. यासाठी भारतीय टीमची निवडही करण्यात आली आहे. खेळाडू 25 मे रोजी मुंबईत एकत्र येतील, यानंतर मुंबईच्या हॉटेलमध्येच बायो-बबल तयार करून त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल. 2 जूनला मुंबईहून टीम इंग्लंडसाठी रवाना होईल. टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू मागच्या काही दिवसांमध्ये आयपीएल खेळत होते, पण टेस्ट स्पेशलिस्ट हनुमा विहारीला (Hanuma Vihari) कोणत्याही टीमने विकत घेतलं नाही. त्यामुळे हनुमा विहारीने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. वारविकशायर आणि हनुमा विहारी यांच्यात करारही झाला, पण तिन्ही सामन्यांमध्ये विहारी अपयशी ठरला. या 3 सामन्यांमध्ये त्याला एकच अर्धशतक करता आलं. हनुमा विहारीने 3 मॅचच्या 6 इनिंगमध्ये 17 च्या सरासरीने 100 रन केले, यात तो दोनवेळा शून्य रनवर आऊट झाला. ऑफ स्पिनर असलेल्या विहारीला एक ओव्हर बॉलिंग करण्याचीही संधी मिळाली. विहारीचा हा फॉर्म बघता त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये खेळण्याची संधी मिळणं कठीण दिसत आहे. वारविकशायरसोबत हनुमा विहारीचा फक्त 3 मॅचचाच करार होता. हनुमा विहारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये तिसऱ्या मॅचवेळी दुखापतग्रस्त झाला. सिडनी टेस्टमध्ये दुखापत झालेली असतानाही विहारीने किल्ला लढवला आणि भारताला टेस्ट मॅच ड्रॉ करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नाबाद 23 रन करून विहारीने अश्विनसोबत टेस्ट मॅच वाचवली होती. या दुखापतीमुळे विहारीला इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्येही दुखापतीमुळे खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आंध्र प्रदेशच्या हनुमा विहारीने 12 मॅचच्या 21 इनिंगमध्ये 33 च्या सरासरीने 624 रन केले आहे, यामध्ये एक शतक आणि 4 अर्धशतकांचाही समावेश आहे. तसंच त्याने 5 विकेटही घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विहारीने 93 मॅच खेळून 55 च्या सरासरीने 7,194 रन केले आहेत. यात 21 शतकं आणि 37 अर्धशतकं, तसंच 27 विकेटही आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या