वर्ल्ड कप मोठी अपडेट
मुंबई : सध्या सर्वांच्या नजरा ह्या वनडे वर्ल्ड कप फायनलकडे आहेत. याच दरम्यान एक वर्ल्ड कप फायनलबाबत मोठी अपडेट येत आहे. 5 सप्टेंबर रोजी FIH पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी C गटात दक्षिण कोरियाविरुद्ध भारत सामना खेळून या स्पर्धेची सुरुवात करेल अशी माहिती मिळाली आहे. हा वर्ल्ड कप 5 सप्टेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान बुकित जलील इथे राष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर होणार आहे. भुवनेश्वर येथे झालेल्या गेल्या वर्ल्ड कपमध्ये (2021) चौथ्या स्थानापर्यंत टीम इंडियाला पोहोचण्यात यश आलं. C गटात भारत आणि दक्षिण कोरिया व्यतिरिक्त स्पेन आणि कॅनडा या टीम आहेत.
हॉकी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाचा राजीनामाभारतीय संघ 7 डिसेंबरला स्पेन आणि 9 डिसेंबरला कॅनडाशी गटसाखळीत भिडणार आहे. शनिवारी पुत्रजया येथील मर्क्युअर लिव्हिंग हॉटेलमध्ये एका समारंभात या स्पर्धेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यजमान मलेशिया गतविजेत्या अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि चिलीसह अ गटात आहेत, तर सहा वेळा विजेते जर्मनी, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका आणि इजिप्त ब गटात आहेत. ड गटात नेदरलँड, बेल्जियम, पाकिस्तान आणि न्यूझीलंड आहेत. क्रीडा प्रेमींसाठी सुपर संडे, दोन वर्ल्ड कप फायनल अन् बरंच काही; पाहा शेड्युल भारतीय टीम 2001 आणि 2016 मध्ये ज्युनियर वर्ल्ड कप विजेता राहिला आहे. आता यंदा हा वर्ल्ड कप जिंकण्यात यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.