JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND VS AUS : हरमनप्रीतची झुंज व्यर्थ! सेमी फायनलमध्ये भारताचा 5 धावांनी पराभव

IND VS AUS : हरमनप्रीतची झुंज व्यर्थ! सेमी फायनलमध्ये भारताचा 5 धावांनी पराभव

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज सेमीफायनाचा पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला गेला.

जाहिरात

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज सेमीफायनाचा पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला गेला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज सेमीफायनाचा पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारताला 173 धावांच आव्हान दिल होत. परंतु हे आव्हान पार करण्यात भारताचा संघ अपयशी ठरला. सेमी फायनल सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव झाला असून पुन्हा एकदा भारताचे महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान पूर्ण करताना 20 षटकात भारताने 8 विकेट्स गमावल्या. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वधिक 52 धावांची खेळी केली. तर त्या खालोखाल जेमिमा रॉड्रिग्सने 24 चेंडूत 43 धावांची खेळी केली. हरमनप्रीत कौरने कर्णधाराचे कर्तव्य चोख बजावत उत्तम खेळी केली.  परंतु हरमनप्रीतची विकेट ही भारतासाठी या सामन्यात टर्निंग पॉईंट ठरली. हरमनप्रीतनंतर कोणतीही खेळाडू भारतासाठी अधिक धावा करू शकली नाही. अखेर भारत यंदाचा महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या