Smriti Mandhana
मुंबई, 14 मार्च : महिला वर्ल्ड कपच्या (Women World Cup 2022) 10 व्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा (India vs West Indies) 155 रननी पराभव केला. या सामन्यात स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) 123 रनची शानदार शतकी खेळी केली. 118 बॉलमध्ये स्मृतीने 13 फोर आणि 2 सिक्स मारले, यात तिचा स्ट्राईक रेट 104.24 चा होता. या खेळीनंतर स्मृती मंधाना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेण्ड व्हायला लागली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार स्मृती मंधाना लोकप्रिय गायक पलक मुच्छलचा भाऊ पलाश मुच्छलला (Palash Muchhhal) डेट करत असल्याचं बोललं जातंय. काहीच दिवसांपूर्वी पलाश मुच्छलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेयर केला, ज्यात त्याच्या हातावर SM18 असं गोंदवलेला टॅटू होता. स्मृती मंधाना 18 नंबरची जर्सी घालते. अनेकवेळा स्मृतीला पलाश मुच्छलसोबत पाहिलं गेलं आहे. हा अभिनेता स्मृतीचा क्रश एका युट्यूब चॅनलशी बोलताना स्मृती मंधानाने कार्तिक आर्यन आपला क्रश असल्याचं सांगितलं. सोनू के टीटू की स्वीटी हा चित्रपट आपल्याला खूप आवडल्याचं स्मृती म्हणाली होती. स्मृतीने दोन वेळा हा चित्रपट बघितला, यानंतर कार्तिक आर्यन आपला क्रश असल्याचं ती म्हणाली. हरमनप्रीतची धमाकेदार खेळी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात उपकर्णधार हरमनप्रीत कौरनेही (Harmanpreet Kaur) धमाकेदार खेळी केली. हरमनप्रीतने या सामन्यात 109 रन केले, ज्यात 10 फोर आणि 2 सिक्स होत्या. हरमनप्रीतचं करियरमधलं हे चौथं शतक होतं. याचसोबत हरमनप्रीत या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करणारी खेळाडूही बनली. तीन सामन्यांमध्ये तिने 185 रन केले, तर 181 रनसह स्मृती मंधाना दुसऱ्या क्रमांकावर आहे.