सर्वाधिक बोली मिळाल्यानंतर स्मृती मानधनाने केला जल्लोष
मुंबई, 13 फेब्रुवारी : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत सुरु असलेल्या या लिलाव प्रक्रियेत स्टार खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी फ्रँचायजीमध्ये चढाओढ सुरु आहे. अशातच भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 3.40 कोटी रुपयांना खरेदी केलं. लिलावाची सुरुवात स्मृतीपासून झाली. मुंबईने पहिल्यांदा स्मृतीसाठी बोली लावली, परंतु अखेर आरसीबीने लिलाव जिंकून तिला आपल्या गोटात समाविष्ट केले. महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक बोली मिळाल्यानंतर टी 20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या स्मृती मानधनाने जल्लोष केला.
मुंबईत सुरु असलेला महिला प्रीमियर लीगचा लिलाव दक्षिण आफ्रिकेत असलेली भारतीय महिलांची टीम पाहता होती. यावेळी स्मृतीवर लागलेल्या बोलीनंतर भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी एकच जल्लोष केला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने स्मृतीला मिठी मारत तिचे अभिनंदन केले.