रोहितचा नातेवाईक करतो विराटला मदत
मुंबई, 18 जुलै : जगातील सर्वांत श्रीमंत खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन विराट कोहलीचा समावेश होतो. त्याच्याकडे सुमारे 1,040 कोटी रुपयांची संपती आहे. या पैकी बहुतांश कमाई जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून मिळते. कोहलीच्या आर्थिक यशामागे त्याचा मॅनेजर असल्याचं म्हटलं जातं. कॉर्नरस्टोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा मालक बंटी सजदेह हा विराट कोहलीचा सध्याचा मॅनेजर आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि टीम इंडियाचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा यांच्याशी फार जवळचे संबंध असूनही त्यानं विराट कोहलीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. बंटी सजदेह स्वत: सुमारे 50 कोटी रुपये किमतीच्या संपत्तीचा मालक आहे. त्याची कंपनी कॉर्नरस्टोन ही विराट कोहलीव्यतिरिक्त केएल राहुल आणि सानिया मिर्झासारख्या खेळाडूंसाठी काम करते. बंटी हा मुंबईतील कॅम्पियन स्कूलचा माजी विद्यार्थी आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील रॉबिना बाँड युनिर्व्हिसिटी आणि मुंबईतील एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये त्यानं उच्च शिक्षण घेतलं आहे. त्यानं वयाच्या 25व्या वर्षी मनोरंजन, मीडिया आणि कम्युनिकेशन कंपनी असलेल्या ‘परसेप्ट’ या कंपनीत टॅलेंट मॅनेजमेंट डिव्हिजनमध्ये काम सुरू केलं. त्यानंतर त्यानं काही काळ ग्लोबोस्पोर्टमध्ये एंटरटेन्मेंट हेड म्हणून काम केलं. शाळा, हॉस्पिटलचे पैसे स्पर्धेसाठी नाही वापरू शकत; व्हिक्टोरियाचा कॉमनवेल्थच्या आयोजनाला नकार खेळावरील प्रेमामुळे बंटीनं 2008 मध्ये ‘कॉर्नरस्टोन’ कंपनीची स्थापना केली. त्यानंतर बंटीनं बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही प्रवेश केला. त्यानं प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरशी पार्टनरशीप केली आहे. जोहर आणि सजदेह यांनी डिसेंबर 2020 मध्ये धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीची (डीसीए) स्थापना केली. या एजन्सीनं अभिनेत्री अनन्या पांडे आणि दक्षिणेतील स्टार विजय देवरकोंडा यांच्यासारख्यांना आघाडीच्या कलाकारांना साइन केलं आहे. टीम इंडियाचा सध्या कॅप्टन रोहित शर्मा हा बंटीचा मेहुणा आहे. रोहितची पत्नी रितिका ही बंटीची चुलत बहीण असून तिनेदेखील कॉर्नरस्टोन कंपनीमध्ये स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. लग्नाआधी रितिका विराट कोहली आणि रोहित शर्माची मॅनेजर होती. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तिनं बंटीची कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेन्मेंट कंपनी जॉईन केली होती. बंटी आणि सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान हेदेखील एकमेकांचे मेहुणे आहेत. बंटीची बहिण सीमा आणि सोहेल पती-पत्नी होते. दोघांनी 2022 मध्ये घटस्फोट घेतला. बंटीनं मॉडेल अंबिका चौहानशी लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर, 2012मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तो रिहा चक्रवर्ती आणि अगदी बॉलीवूड स्टार सोनाक्षी सिन्हा यांना डेट करत असल्याची अफवा पसरली होती. पण, त्यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केलं नाही. विराट कोहली आणि स्पोर्ट्स कंपनी प्यूमा यांच्यातील मेगा-डीलमागे बंटी सजदेह होता. त्यानेच, जवळपास 100 कोटी रुपयांची ही डील यशस्वी केल्याची चर्चा आहे. कॉर्नरस्टोनच्या सहवासात आल्यापासून कोहलीला गेल्या दशकात एमआरएफ, टीसॉट, पेप्सी, कोलगेट, सॅमसोनाईट, व्हॅल्वोलिन, ऑडी आणि पीएनबीसारख्या अनेक ब्रँड एंडोर्समेंट मिळण्यात मदत झाली आहे.