JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO '5 रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी..'कानपूरच्या मैदानात फॅन्सच्या हटके घोषणा

VIDEO '5 रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी..'कानपूरच्या मैदानात फॅन्सच्या हटके घोषणा

मुंबईकर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) कानपूरमध्ये टेस्ट क्रिकेट पदार्पणातच आपले पहिले वहिले शतक झळकावले.

जाहिरात

Shreyas Iyer

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कानपूर, 26 नोव्हेंबर: मुंबईकर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) कानपूरमध्ये टेस्ट क्रिकेट पदार्पणातच आपले पहिले वहिले शतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे क्रिकेट जगतात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच सोशल मीडीयावर श्रेयसचे कानपूरच्या मैदानात अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले आहे. सध्या त्याचे काही ट्विट्स व्हायरल होत आहेत. टी२० मालिकेत न्यूझीलंड संघाला 3-0पराभूत केल्यानंतर, आता या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलाच सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने तुफानी शतक झळकावले. त्याने 157 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांचा साहाय्याने शतक पूर्ण केले होते.त्यानंतर तो 105 धावा करत माघारी परतला. श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक “पाच रुपये की पेप्सी अय्यर भाई सेक्सी…” असे म्हणताना दिसून येतायत.

तसेच सोशल मीडियावर देखील चाहते आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एका चाहत्याने ट्विट करत लिहिले की, “मी स्पष्टपणे ऐकू शकतो की,कानपूरचे प्रेक्षक पाच रुपये की पेप्सी अय्यर भाई सेक्सी…”असे म्हणत आहेत.

पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर संपला आहे. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल, रविंद्र जाडेचा यांनी पहिल्या डावात केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर हे शक्य झालं आहे. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर 105, शुभमन गिल 52, रवींद्र जाडेजा 50 आणि आर आश्विननं 38 धावा केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या