विराट कोहलीने पुन्हा धोनीबद्दल केलं मोठं वक्तव्य
मुंबई, 25 फेब्रुवारी : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि माजी कर्णधार एम एस धोनी यांचा बॉण्ड खूपच स्पेशल आहे. क्रिकेटमध्ये विराटचा वाईट काळ सुरु असताना धोनी विराटच्या पाठीशी उभा राहिला आहे. अनेकदा विराट कोहलीने धोनी सोबतच्या संबंधांवर भाष्य केलं आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच RCB संघाने दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीने धोनीच्या एका वाईट सवयी बद्दल खुलासा केला. RCB संघाच्या पॉडकास्टमध्ये विराट कोहलीने क्रिकेटमधील चांगले वाईट अनुभव शेअर केले. तो म्हणाला माझा वाईट काळ सुरु असताना अनेकांनी मला नाव ठेवली. मी अत्यंत वाईट कर्णधार असल्याचेही अनेकजण बोलले. परंतु या काळात धोनी हा एकमेव व्यक्ती होता, ज्याने 2022 मध्ये माझ्या बॅड पॅचदरम्यान माझ्याशी संवाद साधला होता. मला एमएस धोनीबद्दल खूप आदर आहे. त्याचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि मी त्याच्याशी कोणत्याही परिस्थितीबद्दल बोलू शकतो. त्यामुळे धोनी सोबतछान बॉण्ड असणे हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे" असे त्याने सांगितले. माजी कर्णधाराने फिटनेसवरून रोहित शर्माची काढली लाज, म्हणाले….. कोहलीने या मुलाखतीत धोनीबाबत मोठा खुलासा केला. कोहली म्हणाला की, धोनीशी संपर्क खूप कठीण आहे. तुम्ही क्वचितच त्याच्याकडे पोहोचू शकता. कारण जर मी कोणत्याही दिवशी त्याला कॉल केला, तर 99 टक्के तो उचलणार नाही. कारण तो फोनकडेच पाहत नाही.
विराट कोहलीने या पॉडकास्टमध्ये त्याची पत्नी अनुष्का बद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला माझ्या वाईट काळात अनुष्काने मला चांगली साथ दिली. ती माझ्या सोबत उभी राहिली आणि तिने मला आधार दिला. विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत आहे. १ मार्च पासून इंदोर येथे कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार आहे.