JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मालिका गमावल्यानंतर BCCI देणार कोहलीला दणका! आफ्रिकेविरुद्ध ‘या’ खेळाडूला करणार कर्णधार?

मालिका गमावल्यानंतर BCCI देणार कोहलीला दणका! आफ्रिकेविरुद्ध ‘या’ खेळाडूला करणार कर्णधार?

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणाक आहे. यासाठी 5 किंवा 6 मार्चला भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

जाहिरात

फक्त कोहलीच नाही तर हे तीन खेळाडूही तणावामुळं लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतात. सततच्या क्रिकेटमुळे गेले काही महिने भारताचे फॉर्ममध्ये असलेले खेळाडू दुखापतीमुळं संघाबाहेर आहेत. यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह हे खेळाडू सततच्या क्रिकेटमुळं विराटप्रमाणे एका फॉर्मेटमधून निवृत्ती घेऊ शकतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 मार्च : नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारताला लाजीरवाणा पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान आता याचा फटका कर्णधार विराट कोहलीला बसण्याची शक्यता आहे. भारतीय संघ 12 मार्चपासून दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यासाठी 5 किंवा 6 मार्चला भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होईल. पहिला सामना धर्मशाळा येथे खेळला जाईल. तर दुसरा एकदिवसीय सामना 15 मार्च रोजी लखनऊ येथे तर तिसरा सामना 18 मार्च रोजी कोलकाता येथे खेळला जाणार आहे. दरम्यान, या मालिकेसाठी भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. न्यूझीलंड दौऱ्यात विराटला चांगली कामगिरी करता आली नाही. तसेच, सतत क्रिकेट असल्यामुळे विराटला विश्रांती दिली जाऊ शकते. तर, विराटच्या जागी रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व असेल. वाचा- गांगुलीचा हुकुमी एक्का आता झाला निवड समितीचा प्रमुख, BCCIने केली घोषणा IPLआधी खेळल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकामालिकेआधी रोहित शर्मा, शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांसारखे खेळाडू कमबॅक करू शकतात. रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यादरम्यान जखमी झाला होता. त्यानंतर कसोटी मालिकेतूनही रोहित बाहेर गेला. मात्र आता रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कमबॅक करू शकतो. तर, शिखर धवनही फिट झाल्यामुळं त्यालाही संघाता जागा मिळू शकते. वाचा- सौराष्ट्र संघ फायनलमध्ये! IPLमध्ये 8.40 कोटींना विकत घेतलेल्या गोलंदाज ठरला हिरो हार्दिक पांड्या करणार कमबॅक भारताचा हुकुमी एक्का हार्दिक पांड्याने सप्टेंबर 2019मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो गेले कित्येक महिने मैदानाबाहेर होता. सध्या पांड्या फिट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं त्याला न्यूझीलंडविरुद्ध संधी मिळू शकते. नुकत्याच डीव्हाय पाटील टी-20 लीगमध्ये हार्दिक पांड्याने 39 चेंडूत 105 धावांची शानदार शतकी खेळी केली होती. तर, शानदार गोलंदाजी करत 5 विकेटही घेतल्या होत्या. वाचा- CSKचा कर्णधार नसतो तर…, कमबॅकआधी ‘थाला’ धोनी झाला भावुक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा संभाव्य संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, लोकेश राहुल(विकेटकीपर), ऋषभ पंत, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या