JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / देवा मला पाव! पराभवानंतर विराट अनुष्का पोहोचले महाकालेश्वराच्या चरणी

देवा मला पाव! पराभवानंतर विराट अनुष्का पोहोचले महाकालेश्वराच्या चरणी

क्रिकेटर के एल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतर आता विराट कोहलीने देखील पत्नी अनुष्का सोबत महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. काल तिसऱ्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने दारुण पराभव केल्यानंतर विराट कोहली आज पहाटे मंदिरात पोहोचला.

जाहिरात

विराट अनुष्का पोहोचले महाकालेश्वराच्या चरणी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 मार्च : भारतीय क्रिकेटर्स सध्या आपल्या पत्नींसोबत आध्यात्मिक यात्रा करीत आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदोर येथे तिसरा कसोटी सामना पारपडल्यानंतर भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने आपली पत्नी अनुष्का शर्मा सह उज्जेनच्या महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. कसोटी सामन्यापूर्वी क्रिकेटर के एल राहुल आणि अक्षर पटेल यांनीदेखील आपल्या पत्नींसोबत महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतले होते. काल बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने दारुण पराभव केला. तिसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने भारतावर 9 विकेट्सने विजय मिळून मालिकेत 2-1 ने पिछाडी भरून काढली. सामन्यादरम्यान विराट कोहली सह इतर फलंदाजही काही खास कमाल दाखवू शकले नाही, तेव्हा भारतीय संघावर सध्या बरीच टीका होत आहे. अशातच विराट कोहलीने शनिवारी पहाटे आपल्या पत्नीसह उज्जेन येथील महाकालेश्वर मंदिरात होणाऱ्या भस्म आरतीला पोहोचला. यावेळी त्याने सोहळ परिधान करून अंगाला भस्म लावून शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला. कोणी देव तर कोणी गुरु, भारतीय क्रिकेटर्स यांच्या पुढे होतात नतमस्तक

महाकालेश्वर मंदिराबाबत भारतीय क्रिकेटर्सना खूप आस्था आहे. विराट अनुष्का यावेळी बराच काळ मंदिरात उपस्थित होते. याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी बाबा नीम करौली यांच्या आश्रमाला भेट दिली होती.  यावेळी त्यांनी मुलगी वामिका सह प्रवचन श्रवण केले. तसेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वी विराट अनुष्का यांनी  ऋषिकेशमधील स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमाला देखील भेट दिली होती. तेव्हा यादोघांनी तेथे भंडाऱ्याचे आयोजन केले होते. तेव्हा आध्यात्मिक यात्रा करणाऱ्या या क्रिकेटपटूंनवर देव प्रसन्न होतो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या