JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / व्हॅलेंटाईन डे ला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर करतायंत ब्रोमान्स Photo Viral

व्हॅलेंटाईन डे ला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर करतायंत ब्रोमान्स Photo Viral

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने सर्वत्रच प्रेमाचे वारे वाहत आहेत. अशातच क्रिकेट विश्वातही आज प्रेमाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या बिगबॅश स्पर्धेतील क्रिकेटपटू ब्रोमान्स करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात

व्हॅलेंटाईन डे ला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर करतायंत ब्रोमान्स Photo Viral

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 फेब्रुवारी : आज व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने सर्वत्रच प्रेमाचे वारे वाहत आहेत. प्रेमी युगुल एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करीत असून एकमेकांसोमर प्रेमाची कबुली देखील देतात. अशातच क्रिकेट विश्वातही आज प्रेमाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या बिगबॅश स्पर्धेतील क्रिकेटपटू  ब्रोमान्स करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगने व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने  एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत ऑस्ट्रेलियाचे स्टार क्रिकेटपटू अॅडम झाम्पा हा मार्कस स्टॉयनिस याला किस करताना दिसत आहे. या फोटोला बिग बॅशने ‘हॅप्पी व्हॅलेंटाईन डे’ असे कॅप्शन दिले आहे.

संबंधित बातम्या

क्रिकेट वर्तुळात स्टॉयनिस आणि झाम्पाच्या नात्याची नेहमीच चर्चा असते. स्टॉयनिस आणि झाम्पा हे दोघेही खूप चांगले मित्र असून दोघे अनेकदा एकमेकांसोबत मस्ती आणि ब्रोमान्स करताना पहायला मिळतात. सोशल मीडियावर त्यांची यावरून अनेकदा खिल्ली देखील उडवली जाते.

अॅडम झाम्पाने 2021 मध्ये त्याची गर्लफ्रेंड हैटी सोबत लग्न केले. त्यावेळी त्याचा जिवलग मित्र असलेल्या मार्कस स्टॉयनिसला नेटकऱ्यांची चांगलेच ट्रोल केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या