JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / U-19 World Cup : वर्ल्ड चॅम्पियन बांगलादेशी खेळाडूंचे घाणेरडे वर्तन! टीम इंडियाला कॅमेरासमोर घातल्या शिव्या, VIDEO VIRAL

U-19 World Cup : वर्ल्ड चॅम्पियन बांगलादेशी खेळाडूंचे घाणेरडे वर्तन! टीम इंडियाला कॅमेरासमोर घातल्या शिव्या, VIDEO VIRAL

वर्ल्ड चॅम्पियन बांगलादेशी खेळाडूंचे भान हरपले, ICC करणार कारवाई?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पोटचेफ़्स्टरूम, 10 फेब्रुवारी : बांगलादेशने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकत सगळ्यांना चकित केले. भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात बांगलादेशने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली. मात्र अंतिम सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. बांगलादेशच्या खेळाडूंनी सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की करत शिव्याही घातल्या. या सगळ्या प्रकारानंतर बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीनेही माफी मागितली. असे म्हटले जात आहे की आयसीसीने संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. खेळाडूंनी मर्यादा ओलांडल्या सामन्यानंतर बांगलादेशी खेळाडू खूप वाईट वागले, असे मत भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्गने व्यक्त केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये तणाव होता. सामन्याच्या दुसऱ्या षटकात तन्झिम हसन साकीबच्या थ्रोवर दिव्यंश सक्सेना थोडक्यात बचावला. शाकिबने जाणीवपूर्वक सक्सेनाच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय भारतीय फलंदाज बाद झाल्यावर बांगलादेशचे गोलंदाजही घाणेरडे हावभाव करीत होते. वाचा- टीम इंडिया झाली ट्रोल; ज्या कारणामुळे पाकची उडवली होती खिल्ली, तीच चूक केली!

वाचा- फायनलमध्ये ‘धोनी स्टाईल’मुळे झालं टीम इंडियाचं कमबॅक, विजयापासून 3 पाऊल दूर कॅमेर्‍यासमोर गैरवर्तन बांगलादेशचे खेळाडू खूपच आक्रमकता दाखवत प्रत्येक चेंडूनंतर भारतीय फलंदाजाला सतत काहीतरी सांगत असत. बांगलादेश विजयाच्या जवळ आल्यानंतरही इस्लाम कॅमेर्‍यासमोर शिव्या घालताना दिसला.

वाचा- बांगलादेशी टायगर्सने रचला इतिहास, भारताला पराभूत करत WORLD CUP जिंकला! बांगलादेशच्या कर्णधाराने मागितली माफी बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने आपल्या संघातील खेळाडूंची वर्तणुकीवर दिलगिरी व्यक्त केली आणि असे घडले की जे घडले ते दुर्दैवी होते. बांगलादेशी कर्णधार अकबरने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत वयापेक्षा अधिक परिपक्वता दाखवताना, “आमचे काही गोलंदाज मूडमध्ये होते आणि अधिक उत्साही झाले. सामन्यानंतर जे घडले ते दुर्दैवी आहे. मी भारताचे अभिनंदन करू इच्छितो, असे सांगितले. अंतिम सामन्यात असा झाला टीम इंडियाचा पराभव अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न पाचव्यांदा मोडले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ 177 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाने डकवर्थ लुईस नियमांच्या आधारे हा सामना 3 गडी राखून जिंकला. सामन्याच्या शेवटी पावसामुळे बांगलादेशला विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 42.1 षटकांत मिळवले. बांगलादेशचा संघ प्रथमच विश्वविजेता झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या