पोटचेफ़्स्टरूम, 11 फेब्रुवारी : अंडर-19 वर्ल्ड कपच्या (Under 19 World Cup) भारत-बांगलादेश यांच्यातील अंतिम सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये धक्का बुक्की झाली होती. दरम्यान, यात ICCने पाच खेळाडूंवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये तीन बांगलादेशी खेळाडूंचा तर 2 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. शमीम हुसैन,राकिबुल हसन आणि मोहम्मद तॉहिद हिर्दॉय यांच्याबरोबरच रवि बिश्नोई आणि आकाश सिंह या दोन भारतीय खेळाडूंवरही कारवाई होणार आहे. या सगळ्यांवर लेबल 3चे आरोप लावण्यात आले आहेत. वाचा- भारतीय खेळाडूंना मारण्यासाठी बॅट घेऊन मैदानात आला होता बांगलादेशी खेळाडू आणि…
वाचा- बांगलादेशी खेळाडूंचे घाणेरडे वर्तन! टीम इंडियाला कॅमेरासमोर घातल्या शिव्या खेळाडूंनी मर्यादा ओलांडल्या सामन्यानंतर बांगलादेशी खेळाडू खूप वाईट वागले, असे मत भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्गने व्यक्त केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये तणाव होता. सामन्याच्या दुसऱ्या षटकात तन्झिम हसन साकीबच्या थ्रोवर दिव्यंश सक्सेना थोडक्यात बचावला. शाकिबने जाणीवपूर्वक सक्सेनाच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय भारतीय फलंदाज बाद झाल्यावर बांगलादेशचे गोलंदाजही घाणेरडे हावभाव करीत होते. वाचा- 30 वर्षांनंतर टीम इंडियावर ओढावणार नामुष्की? कॅप्टन कोहलीचे सगळे प्लॅन फेल बांगलादेशच्या कर्णधाराने मागितली माफी बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने आपल्या संघातील खेळाडूंची वर्तणुकीवर दिलगिरी व्यक्त केली आणि असे घडले की जे घडले ते दुर्दैवी होते. बांगलादेशी कर्णधार अकबरने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत वयापेक्षा अधिक परिपक्वता दाखवताना, “आमचे काही गोलंदाज मूडमध्ये होते आणि अधिक उत्साही झाले. सामन्यानंतर जे घडले ते दुर्दैवी आहे. मी भारताचे अभिनंदन करू इच्छितो, असे सांगितले.