सिडनी, 25 जानेवारी : दोन वर्षांपूर्वी पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने अंडर-19 वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले होते. आता दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ वर्ल्ड कप सामन्यात आमनेसामने येणार आहेत. यावेळी हा सामना अंतिम नाही तर उपांत्यपूर्व फेरीचा होणार आहे. याआधी भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडला 44 धावांनी पराभूत केले. भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि दिव्यंश सक्सेना यांनी अर्धशतकी कामगिरी केली. तर, फिरकीपटू रवी बिश्नोई आणि अथर्व अंकोलेकरने शानदार गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. वाचा- मनीष पांडेने केली मोठी चूक! पंचांमुळे वाचला भारतीय संघ, पाहा VIDEO
वाचा- VIDEO : पंतच्या करिअरला लागला सुरुंग! सामन्यानंतर राहुलनेच उडवली ऋषभची खिल्ली भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला असला तरी, त्यांचा संघ उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी झाला. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत 21 ओव्हरमध्ये 105 केल्या होत्या, त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. यानंतर, जेव्हा खेळ सुरू झाला तेव्हा सामना 23-23 षटकांचा करण्यात आला. यात यशस्वी जयस्वाल (नाबाद 57) आणि दिव्यंश सक्सेना (नाबाद 52) यांच्या शानदार डावांमुळे भारताने 115 धावा केल्या. वाचा- VIDEO : भारताला मिळाला नवा धोनी! श्रेयस अय्यरचा विजयी षटकार न्यूझीलंडच्या संघाला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य देण्यात आले. न्यूझीलंडच्या संघानं धमाकेदार सुरुवात केली आणि एका वेळी त्यांची धावसंख्या 83/2 अशी होती. मात्र आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात त्यांनी लवकर विकेट गमावल्या आणि न्यूझीलंडचा संघ 177 धावांवर बाद झाला. भारताकडून रवि बिश्नोईनं 30 धावा देत 4 तर अथर्व अंकोलेकरने 28 धावा देत तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाने आतापर्यंत ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले आहेत. यासह उपात्यपूर्व फेरीपर्यंतही मजल मारली आले. भारताचा पुढचा सामना हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.