टोकयो, 30 ऑगस्ट : टोकयोमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारताला ऐतिहासिक गोल्ड मेडल मिळाले आहे. भारताच्या अवनी लखेरानं 10 मीटर एअर रायफलमध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. 19 वर्षांच्या या महिला शूटरनं 294.6 पॉईंट्सची कमाई करत गोल्ड मेडल पटकावले. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिलेनं पटाकवलेलं हे पहिलं गोल्ड मेडल आहे.
जयपूरच्या अवनीनं या स्पर्धेच्या पात्रता फेरीत 7 वा क्रमांक पटकावून फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. त्यानंतर तिनं फायनलमध्ये कामगिरी उंचावत गोल्ड मेडल पटकावले. भारताने रविवारी टोकयो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) मेडल्सची हॅट्रिक केली होती. अवनीनं ती कामगिरी पुढं सुरु ठेवत ऐतिहासिक गोल्ड मेडल पटकावले. Tokyo Paralympics मध्ये भारताला आणखी एक मेडल, निशादची ऐतिहासिक उडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या यशाबद्दल अवनीचं अभिनंदन केलं आहे. ही भारतीय क्रीडा विश्वासाठी विशेष घटना असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली आहे.
गोल्ड मेडल जिंकणारी चौथी भारतीय अवनी पॅरालिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणारी चौथी भारतीय आहे. भारतासाठी पहिलं गोल्ड मेडल मुरलीकांत पेटकरनं 1972 साली जिंकले होते. पेटकरनं पुरुषांच्या 50 मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेत ही कामगिरी केली होती. त्यानंतर देवेंद्र झाझरियानं 2004 आणि 2016 च्या स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत गोल्ड पटकावले. तर 2016 सालीच रिओमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत मरियप्पन थंगावेलूनं लांब उडीमध्ये गोल्ड मेडलची कमाई केली होती.