JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Tokyo Olympics : कोरोनाच्या सावटामध्ये क्रीडा महाकुंभाला सुरूवात, भारतीय पथकाचे दमदार संचलन! पाहा VIDEO

Tokyo Olympics : कोरोनाच्या सावटामध्ये क्रीडा महाकुंभाला सुरूवात, भारतीय पथकाचे दमदार संचलन! पाहा VIDEO

संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेली टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेला (Tokyo Olympics 2020) सुरूवात झाली आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेवर कोरोनाचं मोठं सावट आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

टोकयो**, 23** जुलै : संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेली टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेला (Tokyo Olympics 2020) सुरूवात झाली आहे. टोकयोतील नॅशनल स्टेडियममध्ये शिस्तबद्ध पद्धतीनं हा कार्यक्रम सुरू झाला. टोकयोमध्ये 1964 नंतर दुसऱ्यांदा ऑलिम्पिक होत आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेवर कोरोनाचं मोठं सावट आहे. कोरोनामुळे ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलावी लागली. यावर्षी देखील ही स्पर्धा स्थगित करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. ऑलिम्पिक उद्घाटन कार्यक्रम हा स्पर्धेच्या आकर्षणाचा मुख्य बिंदू असतो. यंदा कोरोनामुळे फक्त 1000 खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम स्टेडियममध्ये पाहण्याची प्रेक्षकांना परवानगी नाही. मात्र जगभरातील 350 कोटी लोकं टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल तसंच वेगवेगळ्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहात आहेत, असा दावा ऑलिम्पिक आयोजन समितीनं केला आहे. भारताचे फक्त 30 खेळाडू या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. जपानी बाराखडीप्रमाणे उद्घाटन कार्यक्रमातील पथसंचलनात सर्व देशांच्या टीम सहभागी होतील. यामध्ये भारतीय पथकाचा क्रमांक  21 वा होता. भारतीय पुरुष हॉकी टीमचा कॅप्टन मनप्रीत सिंह आणि ऑलिम्पिक मेडल विजेती बॉक्सर मेरी कोम यांना या कार्यक्रमात ध्वज वाहकाचा मान मिळाला. Here they are 💪 #TeamIndia  at the  #OpeningCeremony  of  #Tokyo2020   #Olympics   pic.twitter.com/8K49eWliqF — Doordarshan Sports (@ddsportschannel)  July 23, 2021 टॉस जिंकताच शिखर धवनला पहिल्यांदा मिळाली ‘ती’ संधी, VIDEO VIRAL भारतीय ऑलिम्पिक पथकात यंदा 124 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये 69 पुरुष तर 55 महिला आहेत. एकूण 85 गोल्ड मेडलसाठी भारतीय खेळाडू त्यांची दावेदारी या स्पर्धेत सादर करणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या