मुंबई, 25 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) इतिहास रचला आहे. तिने ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं मेडल आहे. त्याचबरोबर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला तब्बल दोन दशकांनंतर ऑलिम्पिक मेडल मिळालं आहे. मीराबाई चानूचं मोठं स्वप्न शनिवारी पूर्ण झालं. हे मेडल जिंकल्यानंतर तिनं टीमसोबत डान्स करत हा आनंद साजरा केला. त्यानंतर ‘न्यूज 18’ ला मीराबाईनं एक्स्क्लूझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिनं मेडल जिंकल्यानंतरच्या भावना व्यक्त केल्या. ‘हा प्रसंग माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. मला मदत करणारे कोच, फेडरेशन, कुटुंबीय यांचे आभार मानते’, अशी प्रतिक्रिया मीराबाईनं व्यक्त केली. मीराबाईनं त्यानंतर एनडीटीव्हीला मुलाखत देताना, आपण आता पिझ्झा खाणार असल्याचं सांगितलं. मी खूप दिवसांपासून पिझ्झा खाल्लेला नाही. आज मी भरपूर पिझ्झा खाणार आहे, अशी प्रतिक्रिया मीराबाईनं व्यक्त केली होती.
भारताच्या या सिल्व्हर गर्लची प्रतिक्रिया ऐकताच तिला आयुष्यभर फ्री पिझ्झा देण्याची घोषणा डॉमिनोझ कंपनीनं (Domino’s India) केली आहे. मीराबाईला यापुढेही कधीही पिझ्झासाठी प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं कंपनीनं ट्विटरवर जाहीर केलं.
अनुष्कानं शेअर केला मीराबाई चानूचा खास photo, कारण वाचून व्हाल भावुक ऑलिम्पिक मेडल जिंकणे हे माझे लक्ष्य होते. यासाठी आपण कठोर कष्ट केले आहेत. या मेडलमुळे देशातील अनेक वेटलिफ्टर्सना प्रेरणा मिळेल, अशी आशा मीराबाईनं व्यक्त केली आहे.